Padma Shri : झाडीपट्टी रंगभूमीचा ‘महानायक’; कोण आहेत डॉ. परशुराम खुणे?

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Padma Shri Parshuram Khune is Zadipatti Rangbhumi artist from Gadchiroli

ADVERTISEMENT

गडचिरोली : विदर्भातली एक गाजलेली कला म्हणून झाडीपट्टी रंगभूमीची ओळख. विदर्भाच्या काही निवडक कलांची स्वतःची स्वतंत्र्य ओळख आहे आणि याच कलांमध्ये डंका वाजतोय तो झाडीपट्टी रंगभूमीचा. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या चार जिल्ह्यानं झाडीपट्टी रंगभूमी गाजवली आणि या रंगभूमीचे नट आहेत डॉ. परशुराम खुणे. (Padma Shri Parshuram Khune is Zadipatti Rangbhumi artist from Gadchiroli)

याच डॉ. परशुराम खुणे यांना भारत सरकारकडून 2023 सालचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पण ज्यांच्यामुळे या ‘झाडीपट्टी रंगभूमीचा’ पद्मश्री पुरस्कारनं सन्मान झाला, ते परशुराम खुणे नेमके कोण आहेत? हे पाहणं महत्वाचं ठरतं.

हे वाचलं का?

Padma Awards 2023 जाहीर; महाराष्ट्रातून कोणाला मिळाला मान?

कोण आहेत परशुराम खुणे?

परशुराम खुणे गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्याती गुरनुली गावचे रहिवासी. त्यांना त्यांच्या घरातूनच कलेच वारसा मिळाला. नागपूरमध्ये होमियोपॅथीच्या शिक्षणासोबतही त्यांनी नाटकाची आवड जोपासली. त्यानंतर त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीत प्रवेश केला. दिवसा भातशेती करायची आणि रात्री मात्र झाडीपट्टी रंगभूमी गाजवायची. अनेक वर्ष त्यांचा हाच दिनक्रम चालयचा. तब्बल ५० वर्ष त्यांनी रंगभूमीवरून झाडीपट्टीच्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.

ADVERTISEMENT

डॉ. खुणे यांचे सिंहाचा छावा, स्वर्गावर स्वारी, लग्नाची बेडी अशी अनेक नाटकं गाजली. लग्नाची बेडीतल्या त्यांच्या भूमिकेनं प्रेक्षकांना वेड लावलं. एकच प्यायला या नाटकात त्यांनी तळीरामाची भूमिका साकारली. मरीमायचा भुत्या, लावणी भुलली अभंगाला, मी बायको तुझ्या नवऱ्याची, एक नार तीन बेजार, बायको का मातून गेली? ही त्यांची काही गाजलेली नाटकं. त्यांनी अशा ५ हजार नाटकांमधून तब्बल ८०० भूमिका साकारल्या. झाडीपट्टीतले दादा कोंडके अशी त्यांची ओळख. त्यांच्या याच कलेचा पद्मश्री देऊन गौरव करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Padma Awards: घराघरात लावणी पोहचवणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची सदाबहार कहाणी

दरम्यान, पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर डॉ. पुरशुराम खुणे म्हणाले, खूप आनंद वाटला. ही झाडीपट्टीची १५० वर्षांपासूनची परंपरा आहे आणि यातून मी आता ५० वर्ष या रंगभूमीवर वावरतो आहे. खऱ्या अर्थाने मला रसिकांनी खूप प्रेम दिलं. ही रसिकांची, प्रेक्षकांची किमाई आहे. म्हणून हा पुरस्कार मी रसिक प्रेक्षकांच्या चरणी अर्पण करतो आहे आणि. इतक्या टोकावर असलेल्या जिल्ह्यामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य कलाकाराला पुरस्कार दिला, हा माझ्या जिल्ह्यासह विदर्भाचाही गौरव आहे.

दरम्यान, डॉ. खुणे यांनी फक्त रंगभूमीच नाहीतर समाजसेवाही केली आणि राजकारणही गाजवलं. त्यांनी तब्बल १५ वर्ष गावातल्या सरपंचपदाची धुरा सांभाळली. ५ वर्ष उपसरपंच राहिले. यासोबतच गडचिरोली जिल्ह्यात तरुणांना व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचंही कामही ते करतात. शिवाय नक्षलवादी प्रभावातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्याचं कामही ते सातत्यानं करतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT