Patiala Violence : पतियाळात हिंसाचार का उफाळला, मास्टरमाईंड बरजिंदर सिंह परवाना कोण आहे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबमधील पतियाळामध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी बरजिंदर सिंह परवाना याला अटक केली आहे. परवाना या हिंसाचाराचा मास्टरमाईंड असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. पंजाब पोलिसांनी रविवारी सकाळी ७.३० वाजता त्याला मोहाली येथून अटक केली. परवाना मुंबईतून मोहालीला गेला होता.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे बरजिंदर सिंह परवाना याच्यावर आधीच गुन्हेगारी स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत. रविवारी सकाळी मोहाली विमानतळावर पोलीस निरीक्षक शमिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने परवानाला अटक केली. बजिंदर सिंह परवानाने मुंबईवरून विमान पकडलं होतं आणि मोहाली विमानतळावर उतरला होता.

पतियाळात हिंसाचार का घडला?

हे वाचलं का?

‘शीख फॉर जस्टिस ‘चा गुरपतवंतसिंग पनून यांच्या विरोधात शुक्रवारी पतियाळातमध्ये खलिस्तान विरोधी मोर्चा काढण्यात येणार होता. याची माहिती कळल्यानंतर शीख संघटनांनी याला विरोध केला. याच दरम्यान शिवसेना (बाळ ठाकरे) आणि शीख संघटनांमध्ये हिंसक झडप झाली.

दोन्ही बाजूंच्या गटांमध्ये टोकाचा संघर्ष झाल्यानं प्रचंड तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती चिघळू नये आणि पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिसांनी कर्फ्यू लागू केला. त्याचबरोबर इंटरनेट सेवाही बंद केली. या प्रकरणानंतर तीन अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या. यात विशेष पोलीस महानिरीक्षक राकेश अग्रवाल यांची उचलबांगडी केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांच्याही बदल्या करण्यात आल्या.

ADVERTISEMENT

कोण आहे बरजिंदर सिंह परवाना?

ADVERTISEMENT

पंजाब पोलिसांनी पतियाळातील हिंसाचार प्रकरणात बरजिंदर सिंह परवाना याला अटक केली आहे. तो पंजाब शीखांच्या धार्मिक नेत्यांपैकी एक आहे. बरजिंदर सिंह परवाना दमदमी टकसाळ जत्था राजपुरा येथील प्रमुख आहे. त्याला मुखर नेता म्हणून ओळखलं जातं. तो अनेकदा खलिस्तानी नेता जर्नलसिंग भिंद्रनवालेच्या समर्थनार्थ व्हिडीओ आणि विधान करत असतो. खलिस्तानी नेता जर्नलसिंग भिंद्रनवालेला १९८० च्या दशकात शीखांतील कट्टरपंथांचा जन्मदाता मानलं जातं.

१९८४ मध्ये जन्मलेल्या बरजिंदर सिंह परवाना पदवीधारक आहे. पदवी घेतल्यानंतर दोन वर्षांनी त सिंगापूरला निघून गेला होता. तेथून परत भारतात आल्यानंतर तो उपदेशक बनला. परवानाच्या सोशल मीडियावर दहशतवादी कृत्याचं समर्थन करणाऱ्या पोस्ट अधिक असतात. परवानाच्या एका फोटोत त्याच्या दंडावर जर्नलसिंग भिंद्रनवालेचा एक टॅटू आहे.

बरजिंदर सिंह परवाना यापूर्वीही एकदा अटक झाला होता. ८ जुलै २०२१ मध्ये त्याला मोहाली पोलिसांनी अटक केलं होतं. शिवसेना नेता सुधीर सुरी यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध भादंवि १५३, ५०५ आणि १२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चार गुन्हे दाखल असून, त्याची सुनावणी न्यायालयाकडून सुरू करण्यात आली असल्याचे पतियाळात क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक मुखविंदर सिंह चिन्ना यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT