Special Story : अबब…एका पेनची किंमत ६ लाख रुपये, पुण्यात भरलंय पेनांचं प्रदर्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे तिथे काय उणे हे आपण अनेकदा ऐकलं आहे. सध्या डिजीटल युगात वही आणि पेनचा वापर जरा कमीच झाला आहे. परंतू पुण्यात सध्या विविध पेनांचं प्रदर्शन भरलं आहे, ज्यात ग्राहकांना पाच तोळे सोन्यापासून ते जपानी झाडापासून तयार करण्यात आलेली पेनं पाहून विकत घेण्याची संधी मिळणार आहे.

ADVERTISEMENT

पुण्याच्या आपटे रस्त्यावर हॉटेल रामी ग्रँड येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय पेन प्रदर्शनात तब्बल ५ तोळे सोन्यापासून बनवलेलं ६ लाखांचं पेन आकर्षणाचा विषय ठरत आहे. जगभरात मोजके असलेले असे ५१६ पेन या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. याव्यतिरीक्त दुबई शहराची प्रतिकृती साकारलेलं शुद्ध चांदीपासून बनवलेलं अडीच लाखांचं पेन, जपानमधील झाडांपासून बनवलेलं पेन, सोनं-प्लॅटीनमच्या पावडरमध्ये नक्षीकाम केलेलं पेन, शाईचं पेन अशी विविध पेनं या प्रदर्शनात पुणेकरांना अनुभवायला मिळणार आहेत.

फेस्टीवलचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, फ्लेअर पेनचे चेअरमन खुबीलाल राठोड, कुमार प्रॉपर्टीजचे केवलकुमार जैन, न्युरोलॉजिस्ट डॉ. राजस देशपांडे, पीएनजीचे सौरभ गाडगीळ, सुरेंद्र करमचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

हे वाचलं का?

पार्कर, वॉटरमन, मॉन्टब्लँक जर्मनी, वॉल्डमन, शेफस, मॉन्टव्हर्दे, स्क्रिक्स टर्की, लॅमी जर्मनी, पायलट, प्लॅटिनम, फ्लेक्सबुक ग्रीस, लिओनार्डो, मॅग्ना कार्टा या आणि अशा जगविख्यात तब्बल 2 हजारापेक्षा अधिक पेन प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. फेस्टीवलमध्ये २०० रुपयापासून ते 6 लाख रुपये किमतीचे पेन असून फाउंटन पेन, बॉल पेन, रोलर पेन, मल्टीफंक्शनल पेन, कॅलिग्राफी पेन,यांत्रिक पेन्सिल, शाईची विविध ५०० प्रकारची पेनं या फेस्टीवलमध्ये ठेवण्यात आली आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

सुरेंद्र करमचंदानी म्हणाले, आजच्या डिजीटल युगात फाऊंटन पेनच्या वापराला प्रोत्साहन मिळावे आणि फाऊंटन पेनाने लेखनाचा आनंद घेता यावा, यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील विविध प्रकारचे पेन पुणेकरांना पाहता व खरेदी देखील करता येणार आहेत. दिनांक १२ डिसेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आपटे रस्त्यावरील हॉटेल रामी ग्रँड येथे पेन फेस्टीवल सुरु असून सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT