अशा पद्धतीने घेता येतील दहावीच्या परीक्षा ! याचिकाकर्ते धनंजय कुलकर्णींकडून वर्षा गायकवाडांना निवेदन

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचं कारण देत राज्य सरकारने दहावीची परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात पुण्याचे प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. धनंजय कुलकर्णी यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना एक निवेदन करुन दहावीच्या परीक्षा कशा घेता येतील याबद्दलची मांडणी केली आहे.

देव या राज्याच्या शिक्षणव्यवस्थेचं भलं करो, दहावीची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयावर हायकोर्टाचे ताशेरे

विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेत सेंटर, दोन गटांमध्ये विभागणी, दोन प्रश्नपत्रिका, कोरोना चाचणी, मास्क घालणं बंधनकारक, परीक्षा केंद्रात पालकांना प्रवेश नाही, शाळेतल्या शिक्षकांकडून पेपर तपासणी असे पर्याय धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात सादर केले आहेत. जाणून घेऊयात काय आहेत हे पर्याय…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची शाळा केंद्र म्हणून देण्यात यावी.

२) दहावीतल्या विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी करण्यात यावी.

ADVERTISEMENT

३) या विद्यार्थ्यांची स्वतंत्र वेळेत आणि वेगळ्या प्रश्न संच यानुसार परीक्षा घेण्यात यावी.

ADVERTISEMENT

४) प्रत्येक शाळेत इयत्ता ४ थी ते १० चे सर्व वर्ग दोन सत्रांमध्ये निर्जंतुकीकरण करुन परीक्षेसाठी वापरावेत.

५) शाळेत फक्त परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाच प्रवेश द्यावा.

६) पालकांना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये.

७) परीक्षा केंद्राला आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी.

८) परीक्षा केंद्रात येताना प्रत्येकाकडे कोविडचा निगेटीव्ह अहवाल असणं आवश्यक

९) परीक्षा केंद्रावर येताना प्रत्येकाला मास्क लावणं बंधनकारक असेल

१०) प्रत्येक परीक्षेपूर्वी संपूर्ण शाळेचं निर्जंतूकीकरण करुन घेणं अनिवार्य

११) विद्यार्थ्यांना आपल्या घरा जवळील स्थानापासून परीक्षा केंद्रापर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करुन देणं गरजेचं. खासगी व्यवस्था कोरोना वाहतूक नियमाच्या आधीन राहून करावी.

याव्यतिरीक्त धनंजय कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात परीक्षा केंद्रात व्यवस्था कशी असावी याबद्दलही काही पर्याय सूचवले आहेत. ज्यात विद्यार्थ्यांची परीक्षा ही दोन गटात घेऊन पहिल्या गटाची परीक्षा सकाळी १० ते १२ तर दुसऱ्या गटाची परीक्षा ही २ ते ४ या वेळेत घेण्यात यावी. एका वर्गात फक्त ६ विद्यार्थी बसतील जेणेकरुन सोशल डिस्टन्सिंगंच पालन होईल. अशा पद्धतीने नियोजन केल्या, १५ दिवसांत दहावीची परीक्षा पार पडेल आणि पुढच्या १०५ दिवसांमध्ये आपण परीक्षेचा निकाल लावू शकतो असं कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT