पुन्हा वाढले पेट्रोल डिझेलचे दर, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 115 च्याही पुढे

मुंबई तक

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर जात आहेत असं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. तरीही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत २६ टक्के कमी झाले आहेत. तरीही देशात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा आवाक्याच्या बाहेर जात आहेत असं चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालेली नाही. तरीही राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलची किंमत २६ टक्के कमी झाले आहेत. तरीही देशात पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढत आहेत २२ मार्च ते २९ मार्च या आठ दिवसांच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर सातवेळा वाढले आहेत. पेट्रोल प्रति लिटर ८० पैसे तर डिझेल प्रति लिटर ७० पैशांनी महाग झालं आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत पेट्रोल प्रति लिटर १०० रूपयांच्याही पुढे गेलं आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर १००.२१ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे तर डिझेलचा दर ९१.४७ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. सोमवारीच देशातल्या तेल कंपन्यांनी लिटर मागे ३० आणि ३५ पैसे अशी वाढ केली होती. त्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.

मुंबईत आज पेट्रोलचा दर ११५.०४ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलची किंमत ९९.२५ रूपये प्रति लिटर इतकी झाली आहे. आता मुंबईत डिझेलही शंभरी पार करण्याच्या तयारीत आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल १०० ते ११६ रूपये लिटर अशा दराने विकलं जातं आहे.

देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp