Petrol-Diesel Price : महागाईत पेट्रोल-डिझेल दरवाढीचं ‘तेल’; मुंबईत डिझेलचंही ‘शतक’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनामुळे आधीच आर्थिक घडी विस्कटलेल्या सर्वसामान्यांना इंधन महागाईचे तडाखे बसू लागले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असून, आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात मोठी करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर शंभरीपार गेलेल्या मुंबईत आता डिझेलही शतक ठोकलं आहे.

ADVERTISEMENT

ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच इंधन दरवाढीच्या झळा बसू लागल्या आहेत. तेल वितरण कंपन्यांकडून लागोपाठ दरवाढ केली जात असून, आजही (10 ऑक्टोबर) सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

तेल वितरण कंपन्यांनी डिझेलच्या दरात लीटरमागे 35 पैसे, तर पेट्रोलच्या दरात 30 पैसे प्रतिलिटर वाढ केली आहे. या नव्या दरवाढीबरोबरच इंधनाचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

हे वाचलं का?

समजून घ्या : पेट्रोल 100 रूपयांना का मिळतंय?

राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 30 पैशांनी वाढून 104.14 प्रतिलिटर झाले आहेत. तर डिझेलचे दरही 35 पैशांनी वाढून 92.82 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहेत. दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी नवा उच्चांक नोंदवला आहे.

ADVERTISEMENT

देशातील दहा महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर रविवारी लिटरमागे 110.12 रुपयांवर पोहोचले, तर डिझेलही 100.66 रुपये प्रतिलिटर झालं आहे.

ADVERTISEMENT

Petrol Diesel Under GST : शंभरीवर गेलेलं पेट्रोल 70 रूपयांत कसं मिळणार? | समजून घ्या

देशातील प्रमुख महानगरातील इंधन दर (प्रतिलिटर)

दिल्ली – पेट्रोल : 104.14 रुपये, डिझेल : 92.82 रुपये

मुंबई – पेट्रोल : 110.12 रुपये, डिझेल : 100.66 रुपये

कोलकाता – पेट्रोल : 104.80 रुपये, डिझेल : 95.93 रुपये

चेन्नई – पेट्रोल : 101.53 रुपये, डिझेल : 97.26 रुपये

तुमच्या शहरातील दर जाणून घेण्यासाठी…

एक मेसेज करून आपण आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी इंडियन ऑईलच्या एसएमएस सेवेचा वापर करता येईल. आपल्या मोबाईलवरून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवा लागणार आहे. RSP स्पेस देऊन पेट्रोल पंप डिलरचा कोड टाका आणि मेसेज सेंड करा. RSP कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर आपल्या मिळेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT