पिंपरी: लॉजवर सुरु होता वेश्याव्यवसाय, अभिनेत्रीसह तीन महिलांची पोलिसांनी केली सुटका

मुंबई तक

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका लॉजवर धडक कारवाई करत वेश्याव्यवसाय बंद पाडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अभिनेत्रीसह तीन महिलांची देव व्यापाराच्या दलदलीतून सुटका केली आहे. छत्तीसगड येथील अभिनेत्रीकडून पिंपरीत वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. ताथवडे येथील साई लॉजवर हा वेश्या व्यवसाय सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई करत दोन दलालांना अटक केली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने एका लॉजवर धडक कारवाई करत वेश्याव्यवसाय बंद पाडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका अभिनेत्रीसह तीन महिलांची देव व्यापाराच्या दलदलीतून सुटका केली आहे. छत्तीसगड येथील अभिनेत्रीकडून पिंपरीत वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता.

ताथवडे येथील साई लॉजवर हा वेश्या व्यवसाय सुरु असताना पोलिसांनी ही कारवाई करत दोन दलालांना अटक केली आहे.

अनैतिक संबंधामुळे महिलेने गमावला जीव, लॉजवर बोलवून प्रियकराने केली हत्या

छत्तीसगड येथील एका अभिनेत्रीवर पिंपरी-चिंचवड शहरात वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार मुंबई-पुणे महामार्गावर असलेल्या ताथवडे येथील लॉजवर सामाजिक सुरक्षा विभागाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. या सापळ्यात आरोपी अडकल्यानंतर पोलिसांनी अभिनेत्रीसह दोन महिलांची सुटका केली.

हे वाचलं का?