सकाळी-सकाळीच पंतप्रधान मोदींनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस!

मुंबई तक

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. याबाबत खुद्द मोदींनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळीच एम्स रुग्णालयात जाऊन मोदींनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. यासोबतच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. याबाबत खुद्द मोदींनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून (1 मार्च) सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळीच एम्स रुग्णालयात जाऊन मोदींनी कोरोनावरील लस टोचून घेतली आहे. यासोबतच पंतप्रधान मोदींनी लोकांना देखील घेण्याचं आवाहन केलं आहे.

याबाबत खुद्द पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन माहिती दिली आहे. ‘मी एम्समध्ये जाऊन कोव्हिड-19 लसीचा पहिला डोस घेतला. ही गोष्ट कौतुकास्पद आहे की, आमच्या डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी कोरोनाविरुद्धच्या जागतिक लढाईला मजबूत करण्यासाठी त्वरित काम सुरु केलं होतं. जे लस घेण्यास पात्र आहेत त्या सर्वांना मी आवाहन करतो. चला, एकत्र येऊन भारत कोरोनोमुक्त करुयात!’

पंतप्रधान मोदींनी कोणती लस घेतली? (PM Modi Which vaccine took?)

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारत बायोटेकची कोवॅक्सिन COVAXIN (Bharat BioTech) लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. कोवॅक्सिन ही स्वदेशी लस आहे. ज्याला ज्याला भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp