Prashant Damle : “राजकारणी मंडळी २४ तास अभिनय करत असतात, इतका वेळ अभिनय करणं…”

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राजकारणी मंडळी २४ तास अभिनय करत असतात. इतका वेळ अभिनय करणं हा जोक नाही असं परखड आणि सडेतोड मत अभिनेते प्रशांत दामले यांनी मांडलं आहे. पुण्यातल्या कार्यक्रमात प्रशांत दामले यांनी हे मत व्यक्त केलं आहे. आपल्याकडे ७० टक्के लोकांचा राजकारणाशी फारसा संबंध येत नाही. त्यांना त्यांचं जेवण करणं, राहणं, ट्रेन पकडणं, ऑफिसला जाणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं असंही प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं आहे प्रशांत दामले यांनी?

राजकारणी मंडळी ही २४ तास अभिनय करत असतात. हे खूप अवघड आहे. इतका वेळ इतका अभिनय करणं Its not a Joke. त्यामुळे सगळ्या राजकारण्यांना माझा मनापासून सलाम आहे. राजकारणावर नाटक लिहायला हरकत नाही मात्र ते चांगलं लिहिलं गेलं पाहिजे. त्यातली गोष्ट इंटरेस्टिंग हवी.

३०-३५ टक्के लोकांना राजकारणात रस

पत्रकार बांधव आणि इतर साधारण ३०-३५ टक्के लोकांना राजकारणात इंटरेस्ट असतो. बाकी ६५ ते ७० टक्के लोकांना राजकारणात रस नसतो. त्यांना रोजचं जेवण करणं, राहणं, बस पकडणं, ट्रेन पकडणं हे जास्त महत्त्वाचं वाटत असतं. ३०-३५ टक्के लोकांसाठी राजकारणावर नाटक करणं हे पायावर धोंडा मारून घेण्यासारखं होईल कारण जवळपसा ६५ ते ७० टक्के लोकांना ते नाटक रिलेट करता येणार नाही. आमचे निर्माते मोहन तोंडवळकर हे नेहमी सांगायचे की नाटक हे प्रेक्षकाला रिलेट करता आलं पाहिजे. राजकीय नाटक जर रिलेट होणारं असेल तर ते नक्की होऊ शकेल असंही प्रशांत दामलेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT