सातारा निवडणूक : …तर नाक कापलं गेलं असतं का?; राष्ट्रवादीच्या नेत्यानं शशिकांत शिंदेना सुनावलं

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन साताऱ्यात सुरु झालेलं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी खुद्द शरद पवारांना मैदानात उतरावं लागलं. परंतू शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे यांचे प्रतिस्पर्धी रांजणे यांनी आपला अर्ज मागे न घेतल्यामुळे शशिकांत शिंदेचा पराभव निश्चीत मानला जातोय. ज्या जावळी मतदारसंघावरुन साताऱ्यात राजकारण रंगलंय, त्या जावळीकडे मी स्वतः लक्ष देणार असल्याचं शशिकांत शिंदेंनी जाहीर केलं.

ADVERTISEMENT

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानेच शिंदेना घरचा आहेर दिला आहे. शिंदेंनी माघार घेतली असती तर नाक कापलं गेलं असतं का? असा सवाल विचारत त्यांनी दादागिरीचे धंदे बंद करावेत असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी दिला आहे.

शशिकांत शिंदे साहेबांकडे आमदारकी आहे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पद आहे. अनेक पद त्यांच्याकडे आहेत, त्यांना अजूनही मोठे व्हावं पण जावळी तालुक्यामध्ये आता त्यांनी लक्ष घालू नये. आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी जशास तसे उत्तर देऊ शशिकांत शिंदे यांनी आता दादागिरीचा धंदा बंद करावा असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन थेट ललकारले आहे.

हे वाचलं का?

मेढा येथे आज जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर आमदार शशिकांत शिंदे कट परस्परविरोधी समोरासमोर भिडले होते. या गोष्टीचा समाचार घेत मानकुमरे यांनी मतदानानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी जल्लोष करत शशिकांत शिंदेंना आव्हान दिलं आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांची अरेरावी आता खपवून घेतली जाणार नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये जयकुमार गोरेंनी माघार घेताच खासदार उदयनराजे भोसले व शिवेंद्रराजे भोसले यांनी टोकाची भूमिका असून देखील एकत्र येऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये समन्वयाची भूमिका घेतली. त्यामुळे खासदार निंबाळकर यांनी माघार घेताच जर शशिकांत शिंदे यांनी माघार घेतली असती तर त्यांचे नाक कापले गेले असतं का असा सवाल मानकुमरे यांनी विचारला आहे.

ADVERTISEMENT

तालुक्या मध्ये येऊन धिंगाणा घातला गुंड आणले राडा घातला ह्या सर्व प्रकाराला आता जावळी तालुक्याची जनता कंटाळली आहे आणि हीच शशिकांत शिंदे यांची स्टाइल आम्हाला संपवायची होती म्हणूनच एका सर्वसामान्य माणसाला जिल्हा बँकेची उमेदवारी देऊन शशिकांत शिंदे यांच्या विरोधात उभे केले हीच लोकशाहीचा विजय आहे असं मानकुमरेंनी बोलून दाखवलं.

ADVERTISEMENT

शशिकांत शिंदे निवडणुकीच्या माध्यमातून जावळी तालुक्यात येतात आणि दहशत माजवत आहेत हे आता यापुढे खपवून घेतले जाणार नाही यापुढे शशिकांत शिंदे यांनी कितीही धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला तरी आमचे जावळी चे आमदार शिवेंद्रराजेच राहतील असंही मानकुमरेंनी सांगितलं.

सातारा जिल्हा बँक निवडणूक : चार राजे बिनविरोध, पण माजी पालकमंत्र्यांसमोर विजयाचं मोठं आव्हान

शशिकांत शिंदे यांना सातारा जिल्ह्यामध्ये सगळीकडेच स्वतःचं नेतृत्व हवं असतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या तरी स्वतःच्या भावालाच उमेदवारी पाहिजे. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील उद्या स्वतःच्या पोराला उभा करतील, आता हे चालू देणार नाही त्याची दादागिरी व धमकावण्याचे उद्योग आता शिंदे साहेबांनी बंद करावेत असा इशारा मानकुमरे यांनी दिला आहे.

रत्नागिरी जिल्हा बँक निवडणूक : सर्वपक्षीय सहकार पॅनलचं बँकेवर वर्चस्व

रांजणे यांनी शरद पवारांनी विनंती केल्यानंतरही अर्ज मागे न घेतल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी जावळी तालुक्यात मी लक्ष घालणार असल्याचं सांगून विरोधी गटाला थेट आव्हान दिलं. याला उत्तर देताना मानकुमरे यांनी, शिंदेंनी जावळीमध्ये लक्षा घातल्याने आभाळ फाटणार नसल्याचं सांगितलं. ते जावळीत आले म्हणून आम्ही तालुका सोडायचा का, आम्ही असं होऊ देणार नाही…जशास तसं उत्तर देत शिंदेंना खुलं आव्हान दिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT