आमच्या मुलीची बदनामी थांबवा! पुजाच्या कुटुंबाची पत्रातून मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून २२ वर्षीट टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्याप्रकरणावरुन राज्यात मोठं वादळ निर्माण झालं आहे. याप्रकरणात पुजा चव्हाणसोबत नाव जोडल्या गेलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला आहे. विरोधक या प्रकरणात गलिच्छ राजकारण करत असून, पोलिसांना योग्य तपास करुन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

अवश्य वाचा – संजय राठोड यांनी राजीनाम्यात काय म्हटलंय, जाणून घ्या…

यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पुजा चव्हाण यांचं कुटुंबिय आपल्याला भेटून गेलं आणि या भेटीत त्यांनी आपल्या मुलीची होणारी बदनामी थांबवा अशी मागणी केली आहे. पुजा चव्हाणच्या पालकांनी लिहीलेल्या पत्रात नेमक्या काय भावना मांडल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

हे वाचलं का?

अवश्य वाचा – एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असा तपास होता कमा नये !

सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,

ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य

ADVERTISEMENT

विषय – पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवणे बाबत

महोदय,

आमची मुलगी कु. पुजा चव्हाण हिचा दिनांक ७ फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. कुठल्याही माता-पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरुन येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात जी चर्चा होत आहे. तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री. संजय राठोड यांचं नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत. जे निराधार आहेत. आपण यासंबंधी पोलीस चौकशीचे आदेश दिले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

या घटनेचा तपास वेगाने व्हावा. जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चीतच कारवाई कराल याची खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरुन कोणाचाही बळी जाऊ नये. श्री. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. आमची मुलगी गमावली परंतू याआड राजकारण करुन दररोज होणाऱ्या आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचं राजकारण करुन श्री. संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका.

तपासामध्ये श्री. राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करुन न्याय द्यावा. परंतू संशयावरुन मुलीवर किंवा कोणावरही आरोप करु नये. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करुन इथपर्यंत पोहचले आहेत. फक्त संशयावरुन त्यांचाही बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवर कारवाई करावी. राजकारणामुळे व दबावामुळे घाईत निर्णय घेऊ नये. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्याल.

आपले नम्र,

लहू चंदू चव्हाण (वडील)

मंदोधरी लहू चव्हाण (आई)

दिव्याणी लहू चव्हाण (बहीण)

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT