NCP नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाच्या लग्नात अंबानी-अदाणी, 35 विमानांतून आले पाहुणे
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचं लग्न जयपूरमध्ये आहे. या लग्नासाठी म्हणजेच प्रजय पटेलच्या लग्नासाठी जयपूरमध्ये VIP पाहुणे आले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरच्या रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडतं आहे. या समारंभासाठी अनिल अंबानी, गौतम अदाणी यांच्यासह बॉलिवूडच्या तारे-तारकांची उपस्थिती आहे. एवढंच नाही तर विविध पक्षांचे नेतेही या समारंभसाठी आले […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मुलाचं लग्न जयपूरमध्ये आहे. या लग्नासाठी म्हणजेच प्रजय पटेलच्या लग्नासाठी जयपूरमध्ये VIP पाहुणे आले आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरच्या रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडतं आहे. या समारंभासाठी अनिल अंबानी, गौतम अदाणी यांच्यासह बॉलिवूडच्या तारे-तारकांची उपस्थिती आहे. एवढंच नाही तर विविध पक्षांचे नेतेही या समारंभसाठी आले आहेत.

आज तकला मिळालेल्या माहितीनुसार प्रजय पटेलच्या लग्नासाठी बॉलिवूडमधले कलाकार, व्यावसायिक, क्रिकेटर्स हे सगळे लोक आपल्या कुटुंबीयांसह लग्न सोहळ्यासाठी पोहचले आहेत. 18 डिसेंबरपर्यंत म्हणजेच शनिवारपर्यंत सुमारे 35 विमानातून विविध दिग्गज लोक या सोहळ्यासाठी आले आहेत. व्यावसायिका सज्जन जिंदल, अदानी ग्रुपचे प्रमुख गौतम अदाणी, अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी, भारती एअरटेल समूहाचे चेअरमन सुनील भारती त्यांची पत्नी, हिंदूजा समूहाचे श्रीचंद हिंदूजा हे सगळे लग्नासाठी पोहचले आहेत.
प्रफुल पटेलांच्या मुलाच्या लग्नात सलमान खान, अनिल कपूर, शिल्पा शेट्टीसह कलाकारांनी ‘जुम्मे की रात है’वर धरला ठेका
