Kashmir Files वर प्रकाश राज यांची कमेंट, ‘लोक लायकीप्रमाणे..’ अनुपम खेर यांचा संताप!
Prakash Raj Comment On Kashmir Files Anupam Kher Reacts दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने 2022 मध्ये पडद्यावर दहशत निर्माण केली. यावर्षी ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण होईल.तरीही या चित्रपटाबाबत वाद सुरूच आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी ‘द […]
ADVERTISEMENT
Prakash Raj Comment On Kashmir Files Anupam Kher Reacts
ADVERTISEMENT
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने 2022 मध्ये पडद्यावर दहशत निर्माण केली. यावर्षी ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित होऊन एक वर्ष पूर्ण होईल.तरीही या चित्रपटाबाबत वाद सुरूच आहे. विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. अलीकडेच दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘प्रोपगंडा फिल्म’ संबोधून ‘नॉनसेन्स’ म्हटलं होतं. यानंतर, विवेक अग्निहोत्रीनं त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. त्याचवेळी आता बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीही प्रकाश राज यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला लोकांचं प्रेम मिळालं तर त्याचबरोबर तो वादातही सापडला. चित्रपटाबाबतचे वाद अजूनही शांत होण्याचं नाव घेत नाहीत. अशा परिस्थितीत लोक शब्दांचे बाण वापरत घणाघाती टीका करत आहेत.
हे वाचलं का?
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2023: राज्यभरात शिवजंयतीचा उत्साह, आग्र्यातही शिवरायांचा जयघोष
प्रकाश राज यांची ‘The Kashmir Files’ वर कमेंट…
ADVERTISEMENT
मध्यंतरी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज केरळमध्ये एका कार्यक्रमात पोहोचले होते. यावेळी, त्यांनी शाहरुख खानचा चित्रपट ‘पठाण’ तसंच विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सच्या यशाबद्दल बरंच काही सांगितलं होतं. कार्यक्रमात प्रकाश राज म्हणाले होते की, ‘द कश्मीर फाइल्स हा बकवास चित्रपट आहे, हा चित्रपट कोणी बनवला हे आपल्याला माहीत आहे.. बेशरम! आंतरराष्ट्रीय ज्युरी त्यांच्यावर थुंकली. दिग्दर्शक अजूनही विचारतोय, ‘मला ऑस्कर का मिळत नाही? तरीही ते निर्लज्जपणावर उतरले आहेत.’ प्रकाश राज यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
प्रकाश राज यांच्या कमेंटवर अनुपम खेर यांनी प्रत्युत्तर!
‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटात अभिनेते अनुपम खेर यांची महत्त्वाची भूमिका आहे. प्रकाश यांच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त करत टीकास्त्र सोडले आहे. अनुपम खेर म्हणतात, ‘लोक आपापल्या लायकीप्रमाणे बोलतात. काही लोकांना आयुष्यभर खोटं बोलावं लागतं. खरं बोलून आयुष्य जगणाऱ्यांपैकी मी एक आहे. आता कुणाला खोटं बोलून जगायचं असेल तर ती त्यांची इच्छा आहे.’ अनुपम खेर यांनी हे खडेबोल सुनावले.
Shiv Sena पक्ष अन् चिन्ह गेलं! युवासेना, सेनाभवन कुणाकडे.. ‘सामना’ कुणाचा?
विवेक अग्निहोत्री यांनीही प्रकाश राज यांना दिलं होतं चोख प्रत्युत्तर!
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रकाश राज यांच्या कमेंटवर ‘अंधकार राज’ असं म्हटलं. विवेक यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘एक छोटासा चित्रपट… काश्मीर फाइल्सने Urban Naxals ची झोप अशाप्रकारे उडवली आहे की एक वर्षानंतरही त्यांची पिढी अस्वस्थ आहे. प्रेक्षकांना भुंकणारा कुत्रा म्हणत आहे. अंधकार राज, मी भास्कर कसा मिळवू शकतो, ते सर्व कायमच तुमचं आहे.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT