काँग्रेसला दिलेल्या लीडरशीपच्या फॉर्म्युलात ना राहुल गांधी होते ना प्रियंका गांधी-प्रशांत किशोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अशात आज तकला दिलेल्या खास मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला काय फॉर्म्युला दिला ते देखील सांगितलं आहे. एवढंच नाही तर काँग्रेसला दिलेल्या लीडरशीपच्या फॉर्म्युलात ना राहुल गांधी होते ना प्रियंका गांधी असंही प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

प्रशांत किशोर यांनी काँग्रेस पक्षात येण्यास दिला नकार, सुरजेवालांच्या ट्विटमुळे संपला सस्पेन्स

आज तकच्या थर्ड डिग्री या कार्यक्रमात काय म्हणाले प्रशांत किशोर?

हे वाचलं का?

काँग्रेसला मी लीडरशीपचा जो फॉर्म्युला दिला त्यामध्ये राहुल गांधीही नव्हते आणि प्रियंकाही नव्हत्या. काँग्रेसला कोणत्याही पीकेची गरज नाही (प्रशांत किशोर) माझी राजकीय उंची इतकी नाही की राहुल गांधी मला महत्त्व देतील. मला काँग्रेसला जे सांगायचं होतं जो सल्ला द्यायचा होता तो मी दिला आहे.

ADVERTISEMENT

प्रशांत किशोर म्हणाले की काँग्रेसला मी आधीच सांगितलं होतं की पाच राज्यांमध्ये त्यांच्यासाठी सगळीच अडचण आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी तुम्ही काय तयारी करत आहात? यावर प्रशांत किशोर म्हणाले की २०२४ च्या दृष्टीने मी तयारीला लागलेलो नाही. मोदींना कोण आव्हान उभं करणार? असाही प्रश्न विचारला गेला त्यावर प्रशांत किशोर म्हणाले त्याची मला आत्ता कल्पना नाही. एवढंच नाही तर ममता बॅनर्जी यांच्यासोबत काम करण्यासाठी मला काहीही अडचण नाही. त्यांच्याशी माझा वाद तर सोडा साधे मतभेदही झालेले नाहीत.

ADVERTISEMENT

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये फुंकणार प्राण?; पक्ष नेतृत्वासमोर मांडली विजयाची ‘रणनीती’

प्रशांत किशोर यांनी ट्विट करून नुकतीच ही माहिती दिली की त्यांना काँग्रेसने आपल्या पक्षात सहभागी होण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर त्यांनी नाकारली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसने २०२४ च्या निवडणुका समोर ठेवून एक समिती तयार केली आहे. या समितीचे सदस्य म्हणूनच काँग्रसने प्रशांत किशोर यांना ऑफर दिली होती जी त्यांनी नम्रपणे नाकारली आहे.

आणखी काय म्हणाले प्रशांत किशोर?

“मी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे की त्यांनी मला पक्षात सहभागी होण्याची ऑफर दिली. तसंच माझं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं. मी काँग्रेसला जे प्रेझेंटेशन दिलं ते ८ ते ९ तासांचं होतं. त्यामध्ये मी त्यांना अनेक गोष्टी सुचवल्या होत्या. माझ्या सूचनांचं सगळ्यांनीच स्वागत केलं होतं. “

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT