प्रीती झिंटा झाली जुळ्या मुलांची आई, पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री प्रिती झिंटाने दोन मुलांना सरोगसीच्या माध्यमातून जन्म दिला आहे. ही दोन्ही जुळी मुलं आहेत. एक पोस्ट शेअर करत प्रिती झिंटाने याबाबतची माहिती दिली आहे. प्रिती झिंटा आणि तिचा पती जीन गुडइनफ यांच्या घरात या दोन चिमुकल्यांचं आगमन झालं आहे.

काय म्हणाली आहे प्रिती झिंटा?

‘मला आज तुम्हाला अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. जीन आणि मी खूप आनंदी आहोत. आमची मनं कृतज्ञतेने आणि प्रेमाने भरली आहेत. कारण आम्ही आमच्या जुळ्या मुलांचं कुटुंबात स्वागत केलं आहे’ जय आणि जिया अशी या दोन मुलांची नावं आहेत. सरोगसीच्या माध्यमातून या दोन मुलांचा जन्म झाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आमच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाबद्दल आम्ही दोघं खूप उत्सुक आणि आनंदी आहोत. या अविश्वसनीय प्रवासात आमची साथ देणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मनःपूर्वक आभार असंही प्रितीने म्हटलं आहे.

प्रिती झिंटाने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले. फेब्रुवारी 2016 मध्या लॉस एंजल्समध्ये अगदी खासगी सोहळा करत तिने हे लग्न केलं. प्रिती आणि जीनने अतिशय गुपचूप लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो जवळपास सहा महिन्यांनी मीडिया समोर आले होते. आता लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रिती आई झाली आहे. तिला आता जुळी मुलं झाली आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

प्रीती झिंटाने सोल्जर या सिनेमाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. क्या कहना, संघर्ष, दिलसे या सिनेमातल्याही तिच्या भूमिका गाजल्या. हर दिल जो प्यार करेगा, दिल चाहता है, फर्ज, चोरी चोरी-चुपके चुपके, अरमान, कल हो ना हो, लक्ष्य, वीर जारा, कभी अलविदा ना कहना, हॅपी एन्डिंग या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आणि लोकांची मनं जिंकली. नेस वाडियासोबत तिचं अफेअर आणि नंतर तिने त्याच्यावर केलेले आरोप या दोन्हीची चर्चा रंगली होती. तिने आणि जीन गुडइनफने गुपचूप लग्न केलं. त्यानंतर आता पाच वर्षांनी आपण जुळ्या मुलांची आई झाल्याचं प्रीतीने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT