‘सरकारच्या विरोधात काही लोक काळी जादू करत आहेत;’ पंतप्रधान नरेंद्र मोदी असं का म्हणाले?
भाजप सरकारच्या विरोधात 5 ऑगस्ट रोजी. दिल्लीत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांसह इतर काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान निदर्शने केली होती. यावर बोलताना नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली. काळे कपडे घालून सरकारला विरोध केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना घेरले. पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात असे काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत. निराशेच्या गर्तेत […]
ADVERTISEMENT
भाजप सरकारच्या विरोधात 5 ऑगस्ट रोजी. दिल्लीत राहुल गांधी, प्रियांका गांधी यांसह इतर काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान निदर्शने केली होती. यावर बोलताना नरेंद्र मोदींनी विरोधकांवर टीका केली. काळे कपडे घालून सरकारला विरोध केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना घेरले. पंतप्रधान म्हणाले की, आपल्या देशात असे काही लोक आहेत, जे नकारात्मकतेच्या भोवऱ्यात अडकले आहेत. निराशेच्या गर्तेत बुडलेले आहेत. सरकारच्या विरोधात खोटे बोलूनही जनता अशा लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. अशा नैराश्यात हे लोक आता काळ्या जादूकडे वळताना दिसत आहेत, असं मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT
काँग्रेसवर साधला निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पानिपत येथे 909 कोटी रुपये खर्चून 35 एकरांवर दुसऱ्या पिढीच्या (2G) इथेनॉल प्लांटचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी भाषण करताना विरोधकांवर निशाणा साधला.
हे वाचलं का?
कार्यक्रमादरम्यान त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘काळी जादू पसरवण्याचा कसा प्रयत्न झाला ते आम्ही ५ ऑगस्टला पाहिले. त्यांना असे वाटते की काळे कपडे परिधान केल्याने त्यांचा निराशेचा काळ संपेल. परंतु त्यांना हे माहित नाही की त्यांनी कितीही फुशारकी मारली, कितीही काळी जादू केली तरी जनतेचा विश्वास त्यांच्यावर पुन्हा कधीही निर्माण होणार नाही, असं मोदी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मदतीने इथेनॉलचे लक्ष्य गाठले : मोदी
ADVERTISEMENT
पंतप्रधान म्हणाले की, आज देश मोठे संकल्प घेत आहे आणि ते सिद्ध करून दाखवत आहे. ते म्हणाले की काही वर्षांपूर्वी देशाने पेट्रोलमध्ये 10% पर्यंत इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य पूर्ण केले होते. आपल्या शेतकरी बंधू-भगिनींच्या मदतीने हे उद्दिष्ट वेळेपूर्वीच गाठले आहे, असे मोदी म्हणाले. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून 7-8 वर्षात सुमारे 50 हजार कोटी रुपये परदेशात जाण्यापासून वाचवले आहेत. इथेनॉल ब्लेडिंगमुळे जवळपास तेच हजार कोटी रुपये आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या हातात गेले आहेत, असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT
पंतप्रधानांना काँग्रेसचं प्रतित्युत्तर
काँग्रेसने पंतप्रधानांच्या या आरोपांना सडेतोड उत्तर दिले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले. ‘ते काळा पैसा आणण्यासाठी काहीही करू शकले नाहीत, आता ते काळ्या कपड्यांबाबत निरर्थक मुद्दा काढत आहेत. देशाला पंतप्रधानांनी त्यांच्या समस्यांबद्दल बोलावे असे वाटते, पण जुमला जीव काहीही बोलत राहतात.’ असा टोला जयराम रमेश यांनी ट्विट करून लगावला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT