अभिनेता प्रियदर्शन जाधव कोरोना पॉझिटीव्ह; उपचारांसाठी रूग्णालयात दाखल
कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. बॉलिवूडनंतर आता मराठी इंडस्ट्रीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव याला ही कोरोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने स्वतः सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिलीये. View this post on Instagram A post shared by Priyadarshan Jadhav (@priyadarshanjadhavv) प्रियदर्शनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिलीये. प्रियदर्शन त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “मला सर्वांना […]
ADVERTISEMENT
कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. बॉलिवूडनंतर आता मराठी इंडस्ट्रीतही कोरोनाने शिरकाव केला आहे. मराठी दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव याला ही कोरोनाची लागण झाली आहे. प्रियदर्शनने स्वतः सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिलीये.
ADVERTISEMENT
प्रियदर्शनने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिलीये. प्रियदर्शन त्याच्या पोस्टमध्ये म्हणतो, “मला सर्वांना हे कळवायचं आहे की मला सकाळी माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सर्व प्रोटोकॉल पाळत मी स्वतःला आयसोलेट करून घेतलं आहे. त्यासाठी मी रूग्णालयात दाखल झालोय. गेल्या काही दिवसांत ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी त्यांची चाचणी करून घ्यावी ही विनंती.”
प्रियदर्शनने नुकतंच त्याच्या लव सुलभ या सिनेमाबाबत माहिती दिली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रियदर्शन करणार आहे. ठाण्यामध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू देखील करण्यात आलं होतं. याशिवाय सिनेमाचं टीझर पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून लाँच करण्यात आलं होतं.
हे वाचलं का?
‘लव सुलभ’ या सिनेमात प्रियदर्शन जाधवसोबत प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात प्रियदर्शन जाधव लेखन, दिग्दर्शन, अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT