प्रियांका आणि निक जोनास झाले आई-बाबा, सोशल मीडियावर सांगितली आनंदाची बातमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे आई-बाबा झाले आहेत. सरोगसीच्या माध्यमातून प्रियांकाच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं असून तिने ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून सरोगसीच्या माध्यमातून अनेक सेलिब्रेटींनी आई-वडील होण्याचा मार्ग स्विकारला यात आता प्रियांका आणि निकचाही समावेश झाला आहे. प्रियांकाने ही आनंदाची बातमी दिली असली तरीही तिना या खास प्रसंगी आपल्या परिवारासोबत एकातांची मागणी केली आहे. त्यामुळे प्रियांकाच्या घरी आलेला नवीन पाहुणा हा मुलगा आहे की मुलगी हे अद्याप कळलेलं नाही.

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी डिसेंबर २०१८ साली पारंपरिक भारतीय पद्धतीनं लग्न केलं होतं. यानंतर तीन वर्षांच्या कालावधीनंतर ते आई-बाबा झाले आहेत. मध्यंतरी प्रियांका आणि निक यांच्यासंबंधी अनेक बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या, या सर्व बातम्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राजस्थानमधल्या जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये या दोघांच्या लग्नाचा भव्य सोहळा पार पडला होता. निक म्हणजेच निकोलस जेरी जोनास हा अमेरिकन गायक, अभिनेता आणि रेकॉर्ड प्रोड्युसर आहे. वयाच्या ७ व्या वर्षी त्याने अभिनयाला सुरुवात केली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT