PMC: मुंबईला मागे टाकून पुण्याने मारली बाजी, पुणे आता राज्यातील सर्वात मोठी महापालिका!
पुणे: पुणे भारी की मुंबई? असा वाद अनेकदा मुंबईकर आणि पुणेकरांमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो. या वादासाठी त्यांना कोणतीही कारणं पुरेशी असतात. असं असताना आता पुण्याने (Pune) मात्र एक गोष्टीत आता मुंबईला (Mumbai) देखील मागे टाकलं आहे. ते म्हणजे आता पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मुंबई पालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) मागे टाकत राज्यातील सर्वात मोठी […]
ADVERTISEMENT

पुणे: पुणे भारी की मुंबई? असा वाद अनेकदा मुंबईकर आणि पुणेकरांमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो. या वादासाठी त्यांना कोणतीही कारणं पुरेशी असतात. असं असताना आता पुण्याने (Pune) मात्र एक गोष्टीत आता मुंबईला (Mumbai) देखील मागे टाकलं आहे. ते म्हणजे आता पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मुंबई पालिकेला (Brihanmumbai Municipal Corporation) मागे टाकत राज्यातील सर्वात मोठी महापालिका होण्याचा मान पटकवला आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठं शहर असलेल्या मुंबईचं क्षेत्रफळ हे 460 चौरस किलोमीटर एवढं आहे. म्हणजेच आता पुणे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं राज्यातलं सगळ्यात मोठं शहर बनलं आहे.
पुणे शहराच्या जवळ असणाऱ्या तब्बल 23 गावांचा समावेश हा पुणे महानगरपालिकेत करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने 30 जून रोजी घेतला आहे. यामुळे आता 23 गावांचा भूप्रदेश महापालिकेत समाविष्ट झाल्याने राज्यातील सर्वात मोठी महापालिका अशी पुणे महापालिकेची नवी ओळख निर्माण झाली आहे.
23 गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर आता महापालिकेची हद्द ही 485 चौ. किलोमीटर एवढी झाली असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर महसूल विभागाच्या मते हे क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर एवढं झालं आहे.
34 गावे महापालिकेत समाविष्ट केली जावीत यासाठी उच्च न्यायालयात याचिका नागरी कृती समितीकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 2017 साली कोर्टाने निकाल दिल्यानंतर 11 गावांचा सुरुवातीला समावेश करण्यात आला होता. पण इतर 23 गावांचा समावेश हा वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात येईल असा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता.