Pune Audio Clip: ‘तुमची तर सालटीच काढू’, चित्रा वाघ यांचं राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान
पुणे: पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला करण्यात आलेला शिवीगाळ प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपवर आणि आमदार सुनील कांबळेंवर याप्रकरणी तुफान टीका केली. ज्याला आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुम्हाला काय वाटतं हे सगळं करुन होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही? तुमची तर सालटीच काढू.’ असं […]
ADVERTISEMENT

पुणे: पुणे महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला करण्यात आलेला शिवीगाळ प्रकरणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी भाजपवर आणि आमदार सुनील कांबळेंवर याप्रकरणी तुफान टीका केली. ज्याला आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘तुम्हाला काय वाटतं हे सगळं करुन होणाऱ्या अत्याचारांवर आम्ही बोलणार नाही? तुमची तर सालटीच काढू.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावर देखील गंभीर आरोप केले. ‘निलेश लंके यांनी ग्रामीण रुग्णालयातील महिला डॉक्टरला अभ्रद शिवीगाळ केली होती. त्यावर काय कारवाई करणार?’ असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी यावेळी विचारला आहे.
पुण्यातील व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत चित्रा वाघ काय म्हणाल्या?
‘कुठल्याही पक्षाचे कोणतेही लोकप्रतिनिधी असू दे. त्यांनी त्याठिकाणी आपली भाषा ही नीटच वापरायला पाहिजे. दुसरं उदाहरण देते. पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणचे आमदार निलेश लंके याने तर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी आणि तेथील महिला डॉक्टर यांना अभ्रद शिवीगाळ केली. ती शिवीगाळ एवढी घाणेरडी होती की, त्याठिकाणी त्या दोघी त्या दिवसापासून तिथे येतच नाहीएत.’