संशयाचं भूत! तीन वर्षाच्या मुलीला भिंतीवर आपटलं; पती-पत्नीच्या वादात गेला जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पत्नीला पहिल्या पतीपासून नव्हे, तर अनैतिक संबंधातून मुलगी झाल्याच्या संशयातून सावत्र बापाने तीन वर्षाच्या चिमुकलीचं डोकं भिंतीवर आदळलं. यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. अनैतिक संबधातून जन्म झाल्याच्या संशयातून तीन वर्षाच्या मुलीचं भिंतीवर डोकं आपटून खून केल्या प्रकरणी आरोपी वडिलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

जितेंद्र उत्तम पाटील (वय ३३) असं आरोपीचं नाव आहे. मुस्कान असं तीन वर्षीय चिमुकलीचं नाव आहे.

हे वाचलं का?

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथील दुगड शाळेच्या पाठीमागे असलेल्या एका सोसायटीमधील खोलीत आरोपी जितेंद्र पाटील, पत्नी संगीता आणि तीन वर्षाची मुलगी मुस्कान असे तिघे राहत होते.

आरोपी जितेंद्र आणि पत्नी संगीता या दोघांचा जानेवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. लग्नापुर्वीच जितेंद्र याला संगीता यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होतं की, तिला पहिल्या पतीपासून एक अपत्य (मुस्कान) आहे. पण, अनैतिक संबधातून मुस्कानचा जन्म झाला असल्याचा संशय जितेंद्र घेत होता. विवाहबाह्य संबंधातून दोघांमध्ये अनेक वेळा वाद देखील झाले.

ADVERTISEMENT

असाच वाद १३ ते १५ एप्रिल दरम्यान झाला. वाद सुरू असतानाच आरोपी जितेंद्र याने तीन वर्षाच्या मुस्कानचे भिंतीवर डोकं आपटलं. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जितेंद्र उत्तम पाटील यास अटक केली आहे, असं भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT