Viral Video: गोविंदा, गोविंदा... पुणेकरांचा विषयच हार्ड, सोन्याचा चष्मा अन् 25 किलो सोनं घालून बालाजीच्या चरणी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Golden Family Viral Video
Golden Family Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

१८ कोटींचं सोनं गळ्यात घालून मंदिरात जाणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल

point

गळ्यात २५ तोळं सोनं घालणाऱ्या गोल्डन फॅमिलीची रंगलीय तुफान चर्चा

point

गोल्डन फॅमिलीचा व्हायल व्हिडीओ पाहून तुम्ही व्हाल थक्क

Pune Golden Family Viral Video: सोशल मीडियावर पुण्यातील एका 'गोल्डन' फॅमिलीच्या व्हायरल व्हिडीओनं धुमाकूळ घातला आहे. १८ कोटी रुपयांचं 25 किलो सोनं गळ्यात घालून पुण्याच्या भक्तांनी प्रसिद्ध तिरुमालाच्या व्यंकटेश्वर मंदिराचं (तिरुपती बालाजी) दर्शन घेतलं. दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलगा सोन्याच्या अनेक साखळ्या, सोन्याचा चष्मा, बांगड्या, हार, एक '7' नंबरची सोन्याची चैन आणि अनेक सोन्याचे अलंकार घालून मंदिरात पोहोचले होते. या 'सोनेरी' कुटंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (A viral video of a 'golden' family in Pune has created a stir on social media. Devotees of Pune visited the famous Venkateswara temple (Tirupati Balaji) of Tirumala wearing 25 tolas of gold worth 18 crore rupees)

ADVERTISEMENT

या प्राचिन मंदिरात प्रतिदिन जवळपास ९० हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) चे कार्यकारी अधिकारी श्यामला राव यांनी म्हटलं होतं की, जुलै महिन्यात विश्व प्रसिद्ध श्री व्येंकटेश्वर मंदिराच्या प्रसाद बॉक्समध्ये १२५ कोटी रुपयांचा प्रसाद जमा झाला. जुलै महिन्यात २२ लाखांहून अधिक भाविकांनी मंदिराचं दर्शन घेतलं आणि ८.६ लाख भक्तांनी मंदिरात धार्मिक विधीही केल्या. मंदिरात एक कोटींहून अधिक लाडूही विकण्यात आले. हे मंदिर विष्णू देवाचं एक रुप वेंकटेश्वर यांना समर्पित आहे. 

इथे पाहा 'गोल्डन' फॅमिलीचा व्हायरल व्हिडीओ

पुण्यातील या गोल्डन फॅमिलीचा व्हिडीओ पीटीआयने ट्वीटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, पुण्यातील भक्तांनी २५ किलो सोनं घालून तिरुमला व्यँकटेश्वरा मंदिरात आज दर्शन घेतलं. कोट्यावधी रुपयांचे सोन्याचे अलंकार घालून मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या या कुटुंबीयांचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हे वाचलं का?

तसच नेटकऱ्यांनीही या व्हिडीओला प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियाच्या विविध हँडल्सवर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून गोल्डन फॅमिलीचं कौतुक केल ं आहे. तर काहींनी या व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिरुपती बालाजी मंदिरात दर्शन घेत असतानाही या गोल्डल फॅमिलीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT