मुंबई-पुण्याला दिलासा! ‘ओमिक्रॉन’ची लागण झालेल्या पहिल्या रुग्णांचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट जगभरात पसरला असून, महाराष्ट्रातही दाखल झाल्यानं चिंता वाढली होती. मात्र, आता काहीसा दिलासा आहे. मुंबई-पुण्यात प्रथमच आढळून आलेल्या दोन्ही रुग्णांनी कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर मात केली आहे. जिनोम सिक्वेन्सिगमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुण्यातील रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून, मुंबईतील रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

परदेशातून पुणे शहरात परतलेल्या एका व्यक्तीला कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निप्षन्न झालं होतं. जिनोम सिक्वेन्सिग अहवाल आल्यानंतर या व्यक्तीला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलं. सध्या ही व्यक्ती उपचार घेत असून, दहाव्या दिवशी करण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सरकारने आखून दिलेल्या नियमावलीनुसार या व्यक्तीला उद्या (11 डिसेंबर) संस्थात्मक विलगीकरणातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.

omicron symptoms : भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणं आढळली?

हे वाचलं का?

मुंबईतील पहिल्या रुग्णाला डिस्चार्ज

मुंबईत आढळून आलेल्या पहिल्या ओमिक्रॉन बाधित रुग्ण बरा झाला आहे. आरटी-पीसीआर चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णाला बुधवारी सेव्हन हिल्स रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर दुसऱ्या रुग्णालाही लवकरच डिस्चार्ज दिला जाईल असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले होते. 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या 39 वर्षीय व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं होतं. त्याचबरोबर अमेरिकेतून परतलेल्या त्यांची 36 वर्षीय पत्नीही पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यांना काही लक्षणं आढळून आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

राज्यातील पहिला रुग्णही निगेटिव्ह

राज्यात पहिला रुग्ण 24 नोव्हेंबर रोजी आढळून आला होता. 33 वर्षीय व्यक्ती दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये आला होता. जिनोम सिक्वेन्सिगमध्ये त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं होतं.

हा तरुण कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असून, त्याने कोणतीही कोव्हिड प्रतिबंधक लस घेतलेली नव्हती. 24 नोव्हेंबर रोजी त्याला सौम्य ताप आला होता. इतर कोणतीही लक्षणे आढळली नव्हती. तो कल्याण-डोंबिवली येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होता. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT