पुणे : आधी औषधांचा ओव्हरडोस… नंतर दोरीने आवळला गळा; आईची हत्या करून स्वतःलाही संपवलं
पुण्यातील धनकवडी भागात मुलाने आईची हत्या करून स्वतःच आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेरोजगार असलेल्या इंजिनिअर मुलाने हे कृत्य केलं असून, त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारणाचाही उलगडा झाला आहे. पोलिसांना तरुणाने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली आहे. या घटनेमुळे पुण्यात मात्र खळबळ उडाली आहे. धनकवडी भागात राहण्यास असलेल्या इंजिनीअर मुलाने बेरोजगारी […]
ADVERTISEMENT
पुण्यातील धनकवडी भागात मुलाने आईची हत्या करून स्वतःच आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बेरोजगार असलेल्या इंजिनिअर मुलाने हे कृत्य केलं असून, त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारणाचाही उलगडा झाला आहे. पोलिसांना तरुणाने लिहून ठेवलेली सुसाईड नोट सापडली आहे. या घटनेमुळे पुण्यात मात्र खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
धनकवडी भागात राहण्यास असलेल्या इंजिनीअर मुलाने बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या जन्मदात्या आईचा खून केला. त्याने आईला औषधांचा ओव्हरडोस दिला. त्यानंतर दोरीने गळा आवळून जन्म देणाऱ्या आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर तरुणाने स्वतःही गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
कायद्याची थट्टा! पोलीस ठाण्यातच लाथाबुक्क्यांनी आणि पोलिसाच्या पट्ट्याने बेदम मारहाण
हे वाचलं का?
पेशाने इंजिनीअर असलेल्या व्यक्तीने बेरोजगारी व कर्जबाजारीपणामुळे नैराश्यातून हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. आईला औषधांचा ओव्हरडोस दिल्यानंतर त्याने आईला संपवलं.
निर्मला मनोहर फरताडे (वय 76) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तर गणेश मनोहर फरताडे (वय 42) याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गणेश फडतरे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
पुणे : लाखोंची फसवणूक, तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार; ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी
ADVERTISEMENT
शनिवारी धनकवडी येथील एका सोसायटीत ही घटना घडली. याबाबत शोनीत तानाजी सावंत यांनी तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे बेरोजगार होता. त्यातच कर्जबाजारीपणामुळे तो वैतागला होता. त्यातूनच त्याला नैराश्य आलं होतं.
नैराश्यातूनच त्याने स्वतःची आई निर्मला फरताडे यांना औषधांचा ओव्हरडोस दिला. त्यानंतर दोरीने गळा आवळला. यात निर्मला फरताडे यांचा मृत्यू झाला. यानंतर गणेशने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुणे : पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची पोलिसानेच दिली सुपारी; सराईत गुन्हेगाराला बेड्या
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT