sonu sood : सोनू सूदची कार जप्त; निवडणूक केंद्रावर जाण्यास बंदी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, अभिनेता सोनू सूदची बहिणही पंजाब विधानसभेची निवडणूक लढवत आहे. पंजाबमधील 111 जागांसाठी मतदान होत असून, मतदान सुरू असताना निवडणूक आयोगाने अभिनेता सोनू सूदवर मतदार केंद्रावर जाण्यास बंदी घातली आहे.

ADVERTISEMENT

अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद मोगा शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. आज पंजाबमधील 117 जागांसाठी मतदान होत असून, सोनू सूद मतदारसंघातील शिरोमणी अकाली दलाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने सोनू सूदवर मतदान केंद्रांवर जाण्यास बंदी घातली.

हे वाचलं का?

सोनू सूद मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाने केला आहे. तशी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सोनू सूद मतदान केंद्रावर जाण्यास निवडणूक आयोगाकडून मज्जाव करण्यात आला आहे. मतदान केंद्रावर जाण्यास बंदी घालण्याबरोबरच सोनू सूदची कारही जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, शिरोमणी अकाली दलाकडून करण्यात आलेले आरोप सोनू सूदने फेटाळून लावले आहेत. बहीण मालविका सूदला मतदान करण्याचं कुणालाही आवाहन करत नाहीये. आपण फक्त मतदान केंद्रांबाहेरील काँग्रेसच्या बूथचा दौरा करत होतो, असं सोनू सूदने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सोनू सूदची बहीण मालविका सूद यांना मोगा शहर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. सोनू सूद बहिणीचा प्रचार करतानाही दिसला. मतदान होण्याआधी कॉमेडियन कपिल शर्मानेही मालिवका सूद यांना मतदान करण्याचं आवाहन व्हिडीओद्वारे केलं होतं.

ADVERTISEMENT

मोगा शहर मतदारसंघातून भाजपने उमेदवार दिलेला असून, भाजपने काँग्रेसच्याच माजी आमदाराला मालविक सूद यांच्याविरोधात मैदानात उतरवलेलं आहे. काँग्रेसने तिकीट कापल्यानंतर आमदार हरजोत कमल यांना भाजपने तिकीट दिलं. त्यामुळे या मतदारसंघात तगडी लढत बघायला मिळणार असल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT