अजित पवारांच्या भेटीनंतर फडणवीसांशी चर्चा; रोहित पाटलांची का होतेय चर्चा?

मुंबई तक

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी भेट घेतली. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान ही भेटीचा योग घडल्यानं चर्चा होणं स्वाभाविकच होतं. ही भेट नेमकी कशासाठी होती आणि स्थानिक राजकारणावर याचा काय परिणाम होणार यावर चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी भेट घेतली. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान ही भेटीचा योग घडल्यानं चर्चा होणं स्वाभाविकच होतं. ही भेट नेमकी कशासाठी होती आणि स्थानिक राजकारणावर याचा काय परिणाम होणार यावर चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर रोहित पाटलांनी स्वत: ट्विट करत यावर खुलासा केला आणि वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान रोहित पाटलांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते भेटले अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात ही भेट असल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं. नागपूरमध्ये अधिवशेनाच्या काळात घेतलेली ही भेट होती. या भेटीवर रोहित पवार काय म्हणतात ते वाचा.

“आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेत मतदारसंघातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने प्लास्टिक फुलांवर बंदी घालून शेतकरी जे फुल पिकवत आहेत त्याला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी केली. यासाठी लवकरच संबंधित मंत्र्यांसह बैठक लावण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले असून मतदारसंघातील व राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो”, असं रोहित पवार म्हणालेत.

ही भेट होण्याआधी रोहित पाटील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटले, त्यावर ते काय म्हणाले ते पाहा. आज नागपूर येथे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांची भेट घेत मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली.

अजित पवारांची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांना रोहित पाटील भेटले. तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघातून रोहित पाटलांच्या आई सुमन पाटील आमदार आहेत. सुमन पाटील आमदार असल्या तरी रोहित पाटील सातत्यानं मतदारसंघात फिरताना आणि जनाधार वाढवताना दिसतात. त्यामुळे या मतदारसंघातल्या राजकारणात त्यांची चर्चा होत असते. गेल्या काही महिन्यांपासून रोहित पाटील राजकारणात जास्त सक्रिय झाले आहेत, त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात उतरणार, अशा चर्चा सुरू आहेत. त्यातच झालेल्या भेटींनी चर्चांना हवा दिलीये.

हे वाचलं का?

    follow whatsapp