जवान राहुल पाटील यांना अखेरचा निरोप
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील ऊत्राण गावातील रहिवासी आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान राहुल लहू पाटील यांच्या पार्थिवावर काल शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एरंडोल शहरातील रामलीला मैदानावर दुपारी लष्करी इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. राहुल पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता. राहुल पाटील हे पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात होते. गेल्या पाच फेब्रुवारीला […]
ADVERTISEMENT
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील ऊत्राण गावातील रहिवासी आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान राहुल लहू पाटील यांच्या पार्थिवावर काल शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एरंडोल शहरातील रामलीला मैदानावर दुपारी लष्करी इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
ADVERTISEMENT
राहुल पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता.
राहुल पाटील हे पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात होते. गेल्या पाच फेब्रुवारीला कर्तव्यावर असताना राहुल पाटील यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा प्राण गेला. रविवारी सकाळी त्यांचं पार्थिव एरंडोल इथे दाखल झाले. कुटुंबिय आणि नातेवाईकांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरवात झाली.
हे वाचलं का?
भारतीय जवान राहुल पाटील अनंतात विलीन, भावपूर्ण श्रद्धांजली! ???
भारतीय जवान राहुल पाटील यांच्या पत्नीने फेसबुकवर '…
Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Saturday, February 6, 2021
अंत्ययात्रेत तरुणांनी तिरंगा रॅली काढली होती. यावेळी भारत माता की जय, वीर जवान राहुल पाटील अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रेत सैन्य दलाचे अधिकारी, जवान, महसूल आणि पोलिस दलाचे अधिकारी, कर्मचारी तसंच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
सीमा सुरक्षा दल तसंच पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून राहुल पाटील यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या दोन्ही चिमुरड्या मुलींनी अग्निडाग दिला. राहुल पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधीही उपस्थित होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT