Rain Alert : मुंबई-पुण्यासह ‘ही’ शहरं पावसाच्या रडारवर; पुढील तीन तासांत मुसळधार
मुंबईसह महाराष्ट्र भरात डिसेंबर महिना आहे की जून महिना हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याचं कारण आहे आज सकाळपासून पावसाला झालेली सुरूवात. एवढंच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये पाऊस मुक्काम करणार आहे. पुढचे तीन ते चार तास वीजा चमकून मुंबईसह काही शहरांमध्ये पाऊस पडणार आहे. कोणत्या शहरांना देण्यात आला आहे पावसाचा अलर्ट? मुंबई, ठाणे, […]
ADVERTISEMENT

मुंबईसह महाराष्ट्र भरात डिसेंबर महिना आहे की जून महिना हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याचं कारण आहे आज सकाळपासून पावसाला झालेली सुरूवात. एवढंच नाही तर मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये पाऊस मुक्काम करणार आहे. पुढचे तीन ते चार तास वीजा चमकून मुंबईसह काही शहरांमध्ये पाऊस पडणार आहे.
कोणत्या शहरांना देण्यात आला आहे पावसाचा अलर्ट?
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये तीन ते चार तास पावसाचे असणार आहेत. तसंच पुणे, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर या ठिकाणीही पाऊस पडणार आहे. मुंबई आणि इतर परिसराला आधीच बारा तास पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला होता. त्यासोबतच आता या शहरांमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Moderate to intense spells of rain very likely to continue over Mumbai,Thane,Raigad,Palghar & Ratnagiri during next 3-4 hours.Possibility of thunder/lightning acompanied with gusty winds in some areas.Pune,Satara,Nasik,Nandurbar,Dhule Ahmednagar to continue with moderate spells pic.twitter.com/e1RG9NwTP4
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 1, 2021