Raj Thackeray : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात विघ्न, आखाडा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील वातावरण तापलं आहे. ५ जून रोजी होणाऱ्या दौऱ्यात विघ्न येण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण गोंडाचे खासदार आणि अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी आव्हान दिलं आहे. त्यात आता सर्व मोठे महंत आणि धर्माचार्यांनीही सिंह यांना पाठिंबा दिला आहे.

ADVERTISEMENT

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्या या दौऱ्याला विरोध होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी सर्वप्रथम भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी केली.

त्यांच्या मागणीला आता उत्तर प्रदेशात पाठिंबा मिळताना दिसत आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्याबरोबरच आता साधूसंतांकडून राज ठाकरेंकडे माफीची मागणी केली जात आहे.

हे वाचलं का?

इतकंच नाही, तर येथील महंत आणि संतांनी अयोध्येतील रस्त्यांवर बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरेंच्या दैाऱ्याला विरोध केला आहे.

ठाकरेंना विरोध वाढू लागला आहे, तर अयोध्येतील खासदार लल्लू सिंह हे राज ठाकरेंच्या बाजूने उभे असल्याचं दिसत आहे. ते म्हणाले की, ‘जो अयोध्या येईल, त्यांचं स्वागत आहे. जो कुणी प्रभू रामांना शरण येईल त्यांच स्वागत आहे.’

ADVERTISEMENT

आखाडा परिषदेचे अध्यक्ष काय म्हणाले?

ADVERTISEMENT

राज ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल आखाडा परिषदेचे प्रवक्ते गौरी शंकर दास यांचं म्हणणं आहे की, ‘महाराष्ट्रात उत्तर भारतीयांसोब राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चुकीचा व्यवहरार कोला आहे.’

‘ते आता अयोध्येत येऊन स्वतःच राजकारण चमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांना उत्तर भारतीयांसोबत माफी मागावी लागेल. नाहीतर अयोध्या प्रवेश दिला जाणार नाही.’रामाच्या नगरीत मुख्य मार्गांवर बृजभूषण सिंह यांना समर्थन देणाऱ्या अयोध्येतील प्रमुख संतांची पोस्टर लावण्यात आली आहेत.

या पोस्टर्समध्येही राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. त्यांनी माफी मागितली नाही, तर प्रवेश दिला जाणार नाही, अशा आशयाचा मजकूर यावर आहे.

शरयू आरती समितीचे अध्यक्ष काय म्हणाले?

नित्य शरयू आरती समितीचे अध्यक्ष शशिकांत दास यांनीही राज ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल भाष्य केलं आहे. ‘राज ठाकरे हे अयोध्येला येणार आहेत. प्रभू रामचंद्रांना शरण येणार असतील, उत्तर भारतीयांना शरण येणार असतील, तर निश्चितपणे त्यांनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागायला हवी.’

‘रामलल्ला सगळ्यांचे आहेत. प्रत्येकाचे आहेत. राम संपूर्ण देशाचे आहेत, पण ज्यापद्धतीने उत्तर भारतीयांचा विरोध राज ठाकरे यांनी केला होता. तो चुकीचा होता. त्यांनी माफी मागायला हवी,’ असं दास म्हणाले.

राज ठाकरे यांनी भोंग्याविरोधात भूमिका मांडताना अयोध्येच्या दौऱ्याची घोषणा केली होती. ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. मात्र, उत्तर भारतीयांचा अपमान केल्याचा मुद्दा अधोरेखित करत भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केलेला आहे.

बृजभूषण शरण सिंह यांनी विरोध दर्शवल्यानंतर त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. बृजभूषण सिंह हे राज ठाकरेंनी माफी मागण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना पाय ठेवून देणार नाही, असं सिंह म्हणत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT