ईडीने एक पट्टी पढवली आणि राज ठाकरेंच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला-छगन भुजबळ

मुंबई तक

ईडीने एक पट्टी पाठवली आणि राज ठाकरे यांच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला असा टोला महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले छगन भुजबळ? विरोधी पक्ष आम्हाला शत्रू समजतात. कारण नसताना अनेकांना तुरुंगवास […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

ईडीने एक पट्टी पाठवली आणि राज ठाकरे यांच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला असा टोला महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे. सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

विरोधी पक्ष आम्हाला शत्रू समजतात. कारण नसताना अनेकांना तुरुंगवास भोगावा लागतो आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षामध्ये घाबरगुंडी निर्माण केली जात असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी राज ठाकरेंवरतीही तोफ डागली आहे. राज ठाकरेंना निवडणूक आल्यानंतर कंठ फुटला आहे. ईडीने एक पट्टी पढवल्यांनंतर राज ठाकरेंच्या इंजिनाचा ट्रॅक बदलला असा टोमणा त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

काळजी करू नका आपण ओबीसींचा हक्क मिळवणारच आहोत. शेनातले किडे बनून राहू नका बाहेर या. जाती जातीत अडकून पडू नका. ”रोज रोज गिरकर भी मुक्कमल खडा हु, ए मुश्किल देख मैं कहा खडा हु, खुशिया आये जिंदगी में तो चाख लेना दावाई समझकर, अगर गम आये तो वो भी खा लेना मिठाई समझकर” असा शेअर मारत भुजबळांनी उपस्थितांची मनं जिंकली. अनिल देशमुख कोणाशी तरी बोलले हे चौथा माणूस पाचव्याला सांगतो. आता उडत उडत ऐकलं तरी ईडी लागणार, इंग्रज्यांच्या काळामध्ये काही प्रमाणात न्याय होता. वक्त हैं बदल जायेगा, आज तुम्हारा हैं कल मेरा आयेगा असेही भुजबळ म्हणाले. धर्माधर्माच्या मारामारीतून फुले शाहू आंबेडकरांचे विचारचं वाचवू शकतात असंही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?