‘युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना करा’; राज ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबई तक

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात पत्र लिहिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही एक पत्र पाठवलं आहे. राज ठाकरेंनी राज्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात परतीच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात पत्र लिहिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही एक पत्र पाठवलं आहे. राज ठाकरेंनी राज्यात परतीच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात परतीच्या पावसामुळे शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात, “यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढला आहे आणि त्यात परतीच्या पावसाने कहर केला. या परतीच्या पावसाने पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामबाबत शेतकरी बांधव चिंतातुर आहेत.”

देशात कुठेही अशी पद्धत नाही ! प्रभाग रचनेच्या निर्णयावरुन Raj Thackeray सरकारवर कडाडले

हे वाचलं का?

    follow whatsapp