एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुंबईकरांना पत्र
मनसेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला येण्याची ही पहिलीच वेळ असून, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. दरम्यान, याच कार्यक्रमासंदर्भात राज ठाकरेंनी मुंबईकरांना पत्र लिहिलंय. […]
ADVERTISEMENT

मनसेच्या वतीनं दरवर्षी आयोजित करणाऱ्यात येणाऱ्या शिवाजी पार्क दीपोत्सवाचा प्रारंभ आजपासून होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला येण्याची ही पहिलीच वेळ असून, त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे. दरम्यान, याच कार्यक्रमासंदर्भात राज ठाकरेंनी मुंबईकरांना पत्र लिहिलंय.
राज ठाकरेंनी शेजाऱ्यांना, दादरकरांना आणि मुंबईकरांना हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र मनसेकडून आधी वृत्तपत्रांमधून वितरित करण्यात आलं होतं आणि नंतर सोशल मीडियातूनही प्रसिद्ध करण्यात आलंय.
राज ठाकरेंचं पत्र जसंच्या तसं
माझ्या शिवाजी पार्क शेजाऱ्यांनो,
तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,