Raj Thackeray : "विधानसभेत काय घडलं यावर माझं...", नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज ठाकरेंची पोस्ट
Raj Thackeray : नव्या वर्षाची सुरूवात झाली असून, सर्वांकडूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राजकीय मंडळींसाठीही नवं वर्ष महत्वाचं असणार आहे. एकूणच मागच्या वर्षभरात झालेल्या घटना आणि येणाऱ्या काळातील भूमिका याबद्दल राज ठाकरे सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त झाले आहेत. निवडणुकीनंतर काहीच म्हणालेले राज ठाकरे पहिल्यांदा सविस्तर बोलले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राज ठाकरे यांच्याकडून नव्या वर्षाच्या शुभेच्छा

राजकीय, सामाजिक घटनांवर काय म्हणाले?
नव्या वर्षाची सुरूवात झाली असून, सर्वांकडूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. राजकीय मंडळींसाठीही नवं वर्ष महत्वाचं असणार आहे. लोकसभा आणि विधानसभेसारख्या महत्वाच्या निवडणुका पार पडल्या असल्या, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर्षी होण्याची शक्यता आहे. एकूणच मागच्या वर्षभरात झालेल्या घटना आणि येणाऱ्या काळातील भूमिका याबद्दल राज ठाकरे सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त झाले आहेत. निवडणुकीनंतर काहीच म्हणालेले राज ठाकरे पहिल्यांदा सविस्तर बोलले आहेत.
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र!
सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं.
या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं.