Raj Thackeray यांचे विश्वासू सहकारी आदित्य शिरोडकर यांचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि वरूण सरदेसाई यांचीही उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

पुढील वर्षी मुंबई महापालिकेसह 10 महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आहेत. त्याआधीच राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी मानले जाणारे आदित्य शिरोडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं आहे. पुढल्या वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेसाठी हा मोठा झटका मानला जातो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य शिरोडकर यांनी हातावर शिवबंधन बांधलं आणि हाती शिवसेनेचा भगवा झेंडाही घेतला.

हे वाचलं का?

मनसेने तयार केलेल्या बहुचर्चित शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्यावर उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मनसेने प्रमुख महानगरांमधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं होतं. यामध्ये मनसे नेता आणि सरचिटणीस यांचा समावेश होता. उत्तर मुंबईतल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती.

मागच्या वर्षी 23 जानेवारील मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं. मनसेने त्यांचा आधीचा झेंडा बदलून भगवा झेंडा आणि त्यावर असलेली शिवमुद्रा हा झेंडा घेतला. तसंच पक्षाचं पहिलं अधिवेशनही मुंबईत पार पडलं होतं. त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मुंबईतील राजगड कार्यालयात मनसेने बैठक घेतली होती. या बैठकीत बाळा नांदगावकर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत पक्षाचे नेते, महिला व विद्यार्थी तसंच कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असं म्हटलं होतं. बाळा नांदगावकर यांच्या या वाक्यावरून आदित्य शिरोडकर आणि त्यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली होती. मुंबईतले मनसेचे सगळे पदाधिकारी आणि नेते यांच्यात हा प्रकार घडला त्यामुळे पक्षातला अंतर्गत वाद समोर आला होता. आता महापालिका निवडणुकीच्या वर्षभर आधी आदित्य शिरोडकर यांनी राज ठाकरे यांची साथ सोडली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT