राजस्थान काँग्रेसचा संघर्ष हाताबाहेर…, हायकमांड, गहलोत आणि पायलट यांच्याकडे कोणते पर्याय?

मुंबई तक

राजस्थानमध्ये राजकीय नाट्य सुरूच आहे. राजीनामे सादर करणाऱ्या गहलोत गटातील आमदारांनी काही अटी काँग्रेस हायकमांडने निरीक्षक म्हणून पाठवलेल्या मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांच्यासमोर ठेवल्या व त्यांना भेटण्यास नकार दिला. मात्र, पक्षश्रेष्ठींनी या अटी मान्य केल्या नाहीत. अशा स्थितीत मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन हे अशोक गहलोत यांची भेट घेऊन आज दिल्लीत परततील आणि काँग्रेसच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजस्थानमध्ये राजकीय नाट्य सुरूच आहे. राजीनामे सादर करणाऱ्या गहलोत गटातील आमदारांनी काही अटी काँग्रेस हायकमांडने निरीक्षक म्हणून पाठवलेल्या मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांच्यासमोर ठेवल्या व त्यांना भेटण्यास नकार दिला. मात्र, पक्षश्रेष्ठींनी या अटी मान्य केल्या नाहीत. अशा स्थितीत मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन हे अशोक गहलोत यांची भेट घेऊन आज दिल्लीत परततील आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना संपूर्ण राजकीय परिस्थितीची माहिती देतील. अशा स्थितीत राजस्थानमध्ये काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशोक गहलोत पक्षाचे अध्यक्ष झाल्यानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार? गांधी परिवार, अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यासमोर कोणते पर्याय उरले आहेत.

गांधी घराण्यासमोर पर्याय काय?

पहिला- राजस्थानमधील राजकीय संकट संपवण्यासाठी गांधी परिवारासमोर पहिला पर्याय म्हणजे अशोक गहलोत यांना नाराज आमदारांना सचिन पायलट यांना पाठिंबा देण्यास सांगणे. मात्र, गहलोत हे मान्य करतीय याची शक्यता कमी आहे.

दुसरा – गांधी परिवाराकडे दुसरा पर्याय आहे की सीपी जोशी यांना मुख्यमंत्री, दोतसारा यांना उपमुख्यमंत्री आणि सचिन पायलट यांना प्रदेशाध्यक्ष बनवावे. मात्र, पायलट या सूत्रावर आक्षेप घेऊ शकतात.

तिसरा– अशोक गहलोत यांना मुख्यमंत्रीपदी ठेवावे, तर पायलट यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करावे. मात्र, काँग्रेसने आखलेल्या या रणनीतीवर नव्याने काम करावे लागणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp