शरद पवार मोदींची भाषा बोलताहेत; राजू शेट्टी यांचं राज्य सरकारच्या भूमिकेवर टीकास्त्र
महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंद पुकारलेला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेचा समाचार घेतला. राज्य सरकार आणि शरद पवार आता मोदींचीच भाषा बोलत असल्याचा सांगत राजू शेट्टी यांनी टीकास्त्र डागलं. बीडच्या मांजरा नदीकाठच्या गावांना राजू शेट्टी यांनी भेट दिली. “ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी १० […]
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंद पुकारलेला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्य सरकारच्या शेतकऱ्यांबद्दलच्या भूमिकेचा समाचार घेतला. राज्य सरकार आणि शरद पवार आता मोदींचीच भाषा बोलत असल्याचा सांगत राजू शेट्टी यांनी टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
बीडच्या मांजरा नदीकाठच्या गावांना राजू शेट्टी यांनी भेट दिली. “ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी १० रिकव्हरील २९०० एफआरपी जाहीर झालेली आहे. मात्र महाराष्ट्रातील साखरेचा उतारा लक्षात घेता आणि तोडणी वाहतुकही त्यातून वजा केली जाते. तर एकूण एफआरपीवर रिकव्हरी ठरते. त्याचा विचार केल्यास सांगली, कोल्हापूर भागात २८०० ते ३००० रुपयांपर्यंत बसते, तर मराठवाड्यात २५०० ते २६०० पर्यंत बसते; परंतु इथे रिकव्हरी मारली जाते. चोरली जाते तसेच तोडणी आणि वाहतुकीचा खर्च जास्त दाखवला जातो यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लूट होते”, असं शेट्टी म्हणाले.
“केंद्र सरकार एफआरपीचे तीन तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहे. नीती आयोगाचा रिपोर्ट तयार झालेला आहे. कृषिमूल्य आयोगानं शिफारस केली आहे आणि जे काही चौदा पंधरा राज्यातील वेगवेगळे ऊस पट्टे आहेत, त्या राज्यांचा केंद्र सरकारने अभिप्राय मागितला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने देखील तीन तुकडे करायला काही हरकत नाही अशी भूमिका घेतलेली असल्यामुळे ही दुर्दैवाची गोष्ट आहे”, अशी टीका शेट्टी यांनी केली.
हे वाचलं का?
“भारतीय जनता पार्टीचे लोक हे शेतकरी विरोधी आहेत. त्यांना शेतीतील काही कळत नाही म्हणून महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आलं आहे आणि तेही आता शेतकऱ्यांना तुकड्या तुकड्याने पैसे द्या असं म्हणते म्हणजेच पवार साहेब मोदींची भाषा बोलत असतील, तर त्यांनी खुशाल बोलावी मात्र महाराष्ट्रातील शेतकरी एकरकमी एफआरपीवर ठाम आहे आणि ठामच राहणार”, असं शेट्टी यांनी सुनावलं.
‘तुम्ही पवारांच्या बाजूने की शेतकऱ्यांच्या बाजूने’, असा प्रश्न शेट्टी यांना विचारण्यात आला. त्यावर “मी शेतकऱ्यांच्याच बाजूने असल्याचं शेट्टी यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT