राजू श्रीवास्तव रिकाम्या हाती मुंबईत आले अन् जाताना कुटुंबासाठी ठेवून गेले कोट्यवधींची संपत्ती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकप्रिय कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा मृत्यूविरुद्ध संघर्ष थांबला. दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात राजू श्रीवास्तवांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याबद्दलच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांकडून दिला जातोय. राजू श्रीवास्तव यांचा सुरुवातीचा काळ प्रचंड आव्हानांचा होता. त्यांना स्वतःची ओळख मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.

ADVERTISEMENT

राजू श्रीवास्तव यांच्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दलचे किस्से त्यांचे मित्र अशोक मिश्रा यांनी आजतकशी बोलताना सांगितले.

राजू श्रीवास्तव सुरुवातीला राहायचे महिला फ्लॅटमेट सोबत

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, पण राजू श्रीवास्तव मुंबईत आल्यानंतर एका महिलेसोबत फ्लॅटमध्ये राहायचे. राजू श्रीवास्तव यांची फ्लॅटमेट एक वयोवृद्ध महिला होती. राजू श्रीवास्तव यांच्याकडे पैसे नव्हते. कसंतरी ते जेवणाची व्यवस्था करू शकत होते. त्यामुळे एकट्यासाठी भाड्याने फ्लॅट घेणं त्यांना शक्यच नव्हतं.

हे वाचलं का?

Raju Srivastava: राजू श्रीवास्तव यांच्या परिवारात कोण-कोण आहे?, काय करतात मुलं

त्यामुळे राजू श्रीवास्तव एका वयोवृद्ध महिलेकडे पेईंग गेस्ट म्हणून राहायचे. एका रुमचं भाडं ते द्यायचे. नंतर राजू श्रीवास्तव यांना काम मिळायला लागलं आणि त्यांनी दुसरीकडे फ्लॅट भाड्याने घेतला.

ADVERTISEMENT

राजू श्रीवास्तव यांनी खरेदी केला पहिला फ्लॅट

शेअरिंगमध्ये राहिल्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी मालाडमध्ये जनकल्याण नगरमध्ये २.५ लाखांमधये वन रुम किचन फ्लॅट विकत घेतला. ज्याची किंमत आजघडीला अंदाजे सवा कोटींपेक्षा अधिक आहे. नंतर राजू श्रीवास्तव यांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी ओशिवरा पोलीस ठाण्याच्या समोरच्या बाजूला मेरीगोल्ड बिल्डिंगमध्ये डबल बेडरुम फ्लॅट खरेदी केलं होतं.

ADVERTISEMENT

कॉमेडियन राजू श्रीवास्तव याचं निधन; उत्तम अभिनेता ते राजकारणी असा प्रवास

हा फ्लॅट खरेदी केला त्यावेळी त्याची किंमत २२ लाख रुपये होती. आजघडीला या फ्लॅटची किंमत दीड कोटींपेक्षा जास्त आहे.

राजू श्रीवास्तव कोट्यवधी संपत्तीचे मालक

२००५ मध्ये ‘राजू लाफ्टर चॅलेंज’ राजू श्रीवास्तव हे कॉमेडीतील सुपरस्टार बनले. त्याचबरोबर ते इतरही शो करू लागले. राजू श्रीवास्तव त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्यानंतर राजू श्रीवास्तव यांनी लोखंडवाला येथील समर्थ येथे दोन कोटी रुपयांत ४ बीएचके फ्लॅट खरेदी केला.

पुढे याच बिल्डिंगमध्ये राजू श्रीवास्तव यांनी पुन्हा एक फ्लॅट खरेदी केला होता. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या लष्करातून निवृत्त झालेल्या भावालाही दिल्लीत घर खरेदी करून दिलं. कानपूर आणि लखनऊ मध्येही बंगले खरेदी केलेले आहेत.

राजू श्रीवास्तव यांची संपत्ती किती?

राजू श्रीवास्तव हे लोकप्रिय कॉमेडियन होते. प्रसिद्धीच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर ते मोठी फीस घ्यायचे. राजू श्रीवास्तव एका शो साठी ४ ते ५ लाख रुपये फीस घ्यायचे. रिपोर्टसनुसार राजू श्रीवास्तव यांची नेटवर्थ २० कोटी रुपये इतकी आहे. त्याचबरोबर घरं आणि गावाकडेही अलिशान बंगला आहे.

राजू श्रीवास्तव यांना कार आवडायच्या त्यामुळे त्यांनी कार्सचं कलेक्शन केलेलं होतं. इनोव्हा, बीएमडब्ल्यू ३, ऑडी क्यू या महागड्या गाड्याही आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT