उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपतींना दिलेला शब्द फिरवला?; संजय राऊतांनी केला खुलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेताना मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला होता. संभाजीराजेंनी केलेल्या गौप्यस्फोटावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही चिमटा काढला.

ADVERTISEMENT

शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत असून, त्यासाठी शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांनी शिव संपर्क अभियानाला सुरूवात करण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.

‘त्यांनी केव्हाही हाक द्यावी, संभाजी छत्रपती त्यांच्या सेवेसाठी हजर असेन’; 11 महत्त्वाचे मुद्दे

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना संभाजीराजे छत्रपती यांनी उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवल्याच्या आरोपाबद्दल विचारण्यात आला. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडण्यात आला. त्यावर संजय राऊत यांनी भूमिका मांडली.

राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतोय, तो चुकीचा आहे. शिवसेनेची जागा आहे. शिवसेनेचा उमेदवार येणं किंवा आणायचाच, हे आधीच ठरलं होतं. माझ्या माहिती प्रमाणे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजेंना असं सांगितलं होतं की, पुरस्कृत उमेदवाराच्या विषयाबद्दल मला सहकाऱ्यांशी बोलावं लागेल. इतकंच ते बोलले होते.”

‘मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती’; संभाजीराजे छत्रपतींची राज्यसभा निवडणुकीतून माघार

ADVERTISEMENT

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “काल संभाजीराजेंनी त्यांचं मन मोकळ केलं आहे. मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे. त्यात नवीन काही नाही. आमचा पक्ष आहे. आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेतो. उद्धव ठाकरे घेतात. त्यांनी एक निर्णय घेतला की, दोन शिवसैनिक पाठवायचे.”

ADVERTISEMENT

“जर ४२ मतांचा विषय होता आणि तुम्हाला राजकारणात करिअर करायचं असेल, तर राजे, महाराजे, राजकारणातील संस्थानिकांना कुठल्यातरी राजकीय पक्षांचा हात धरावा लागतो. देशभरात बघितलं, तर महाराणा प्रतापांचे वंशज सुद्धा राजकीय पक्षात आहेत. प्रत्येकाचे राजकीय लागेबांधे आहेत. व्यक्तिगत काही नसतं इथे. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी स्वीकारली नाही. आमच्यासाठी हा विषय संपला,” अशी भूमिका राऊतांनी मांडली.

‘चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का?’

संभाजीराजे छत्रपती यांच्या आरोपानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

पाटलांनी दिलेल्या आव्हानावर राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील कोण? ते काय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी २०१९ ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कुणाची आहे, फसवण्याची परंपरा कुणाची आहे? संभाजीराजे छत्रपती आणि आमच्यातील हा विषय आहे. इतरांनी चोपडेपणा करू नये,” अशा शब्दात राऊतांनी पाटलांना प्रत्युत्तर दिलं.

काँग्रेस महाराष्ट्रातून कुणाला पाठवणार राज्यसभेत? कोणती चार नावं आहेत चर्चेत?

देवेंद्र फडणवीस शिवसेनेत येताहेत का?

देवेंद्र फडणवीसांनीही या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. त्यावर राऊत म्हणाले, “या सगळ्या प्रकरणाशी त्यांचा काय संबंध आहे. हा आमच्यातील विषय आहे. त्यांनी ४२ मतं द्यावीत. त्यांना आम्ही उत्तर का द्यायचं. देवेंद्र फडणवीस आमच्या पक्षात येत आहेत का? आमच्या पक्षाच्या निर्णयाबद्दल आम्ही त्यांना का उत्तर द्यायचं,” असा उलटा सवाल राऊतांनी केला.

“छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत”

“छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या मालकीचे नाहीत. ते संपुर्ण देशाचे आणि विश्वाचे आहेत. आम्हाला त्या गादीविषयी पहिल्यापासून आदर आहे. तो तसाच राहिल,” असंही राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT