Rajya Sabha Election : मतदानासाठी वापरलं जातं खास पेन, काय आहेत वैशिष्ट्ये?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

१० जूनला राज्यसभेसाठी मतदान पार पडतं आहे. ही निवडणूक चुरशीची होणार यात काहीही शंका नाही. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चढाओढ रंगली आहे. खासकरून भाजप आणि शिवसेना यांच्यात ही लढाई रंगणार आहे. राज्यसभेचं मतदान हे इतर मतदानांसारखं नसतं. तर त्यासाठी खूप काळजी घेऊन मतदान करावं लागतं. या मतदान प्रक्रियेत थोडी चूक झाली तर चित्र बदलू शकतं.

या निवडणुकीसाठी वापरण्यात येणारं पेन हे पेन विशिष्ट प्रकराचं असतं, हे पेन फक्त निवडणुकीसाठीच तयार केलं जातं. राज्यसभा निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा वापर केला जातो. मात्र यामध्ये शिक्का वापरला जात नाही. मतदानासाठी विशिष्ट प्रकारचा पेन वापरला जातो. या पेनचा वापर भारतीय निवडणूक आयोगाकडून केला जातो.

काय आहेत या पेनाची वैशिष्ट्ये?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे पेन फक्त राज्यसभा निवडणुकीसाठीच तयार केलं जातं

सर्व सामान्यांसाठी हे पेन तयार केलं जात नाही

ADVERTISEMENT

ज्या राज्यांमध्ये निवडणूक होते आहे तिथे आयोगाकडून ठराविक संख्येतच हे पेन पाठवले जातात.

ADVERTISEMENT

मतदान निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे पेन पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला पाठवलं जातं

राज्यसभा निवडणूक पेनशी संबंधित तक्रारी आणि वाद झाल्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने मतदानासाठी हे पेन पाठवण्यास सुरूवात केली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान कसं होतं? आमदारांना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात?

पेनासंदर्भात काय नियम आहे?

मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदाराला (आमदार) पेन दिला जातो. त्याचाच वापर आमदाराला मतदान करताना करावा लागतो. हा पेन मतपत्रिकेसोबतच दिला जातो. इतर कोणतंही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन अथवा चिन्हांकित करण्याचं कोणतंही साधन यांचा वापर आमदाराने केला तर ती मतपत्रिका अवैध ठरवली जाते.

-आमदारांना दिल्या जाणाऱ्या मतपत्रिकेवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पुढे पसंतीक्रम असा रकाना असतो. आमदाराला प्रथम पसंतीक्रम म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम या स्तंभात १ हा अंक लिहून मतदान करायचं असतं. १ असा अंक फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर लिहायचा असतो.

२०१६ ला काय घडलं होतं?

२०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांनी मतदान करताना चुकीचं पेन वापरलं गेलं होतं त्यामुळे काँग्रेसची १२ मतं रद्द करण्यात आली होती. आवश्यक मतांचा कोटा नसतानाही फक्त काँग्रेसची एवढी मत रद्द झाली त्यामुळे अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर गेले होते. काँग्रेसची मतं रद्द झाली त्याचं कारण हे पेन होतं. इलेक्शन कमिशनने दिलेलं पेन बदलून साधं पेन मतदान कक्षात ठेवलं होतं. त्यामुळे ही मतं त्यावेळी बाद झाली होती.

निवडणूक आयोगाने कमिशनने दोऱ्याला बांधून ठेवलेल्या जांभळ्या पेनने आपलं मत न नोंदवता दुसऱ्या निळ्या पेनानं मत नोंदवलं होतं असं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेसची १२ मतं बाद झाली होती.

२०१६ नंतर अशा प्रकारच्या निवडणुकीत असा कोणताही प्रश्न किंवा त्यावरून वाद निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने खास पेनची निर्मिती करण्याचा आणि ते फक्त राज्यसभा निवडणुकीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यानंतर डिझाईन केलेल्या पेनानेच मतदान करण्याचा नियम सुरू झाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT