फुटलेल्या ४० आमदारांची नाही तर ‘यांची’ मदत झाली : फडणवीसांनी फोडलं राज्यसभेचं सिक्रेट
मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली अधिकची मत शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराची नव्हती, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत कोणाची मदत घेतली याबद्दलचं सिक्रेट फोडलं. ते शनिवारी इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते. यावर्षी जून महिन्यात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये अनेक वर्षांनंतर मतदान झालं होतं. यात भाजपनं दोन उमेदवार निवडून येण्याची […]
ADVERTISEMENT
मुंबई : बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेली अधिकची मत शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांपैकी एकाही आमदाराची नव्हती, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीत कोणाची मदत घेतली याबद्दलचं सिक्रेट फोडलं. ते शनिवारी इंडिया टुडेच्या कॉनक्लेव्हमध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
यावर्षी जून महिन्यात पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये अनेक वर्षांनंतर मतदान झालं होतं. यात भाजपनं दोन उमेदवार निवडून येण्याची ताकद असताना देखील धनंजय महाडिक यांच्या रुपाने तिसरा उमेदवार दिला आणि त्यांना निवडूनही आणलं. त्यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे चौथे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला होता.
या घडामोडींबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेली अधिकची मतं फुटलेल्या ४० आमदारांपैकी कुणाचीच नव्हती. त्यावर मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी तुम्हाला राष्ट्रवादीची मत मिळाली का? असा सवाल केला. त्यावर फडणवीस म्हणाले, मी म्हणतं नाही आम्हाला राष्ट्रवादीची मत मिळाली. काँग्रेसही असू शकत, किंवा इतर दुसरं कोणीही असू शकत. अपक्ष असू शकतात. पण मी एक खूपच स्पष्टपणे सांगू इच्छितो की यातील शिवसेनेचे एकही मतं मिळालं नव्हतं.
हे वाचलं का?
फडणवीसांचं वजन झालं कमी :
यावेळी कॉनक्लेव्हच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीस यांचं वजन कमी झाल्याचं आणि शरीरावर बरीच मेहनत घेतल्याचं दिसून आलं. यालाच धरुन मुंबई तकचे संपादक साहिल जोशी यांनी राजकीय प्रश्न विचारतं तुमच्या शारीरिक वजनासोबतच उपमुख्यमंत्री झाल्यामुळे राजकीय वजनही कमी झालं आहे का? असा सवाल विचारला. यावर बोलताना ते म्हणाले, राजकारणात तुम्ही कोणत्या पदावर आहात यावर वजन ठरतं नसतं तर तो तुम्ही कोण आहे, त्यावर ठरतं असतं. त्यामुळे महाराष्ट्रात जाऊन कोणालाही विचारा माझं वजन कमी झालं की वाढलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT