शिरुरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजप नेते गणेश बिडकर यांच्या फार्म हाऊसवरील प्रकार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील शिक्रापुर येथे फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिडीतेच्या नात्यातील तरुणानेच मारुन टाकण्याची धमकी देत तिच्यावर बालात्कार केला. विशाल गायकवाड असे संशयित आरोपीचे नाव असुन शिक्रापुर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, घटना घडलेले फार्म हाऊस आणि शेती हे पुण्यातील भाजपाचे बडे नेते आणि माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात राजकीय कनेक्शन समोर येताच भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही यात उडी घेतली असून पीडितेला न्याय मिळुन देण्यासाठी दबाव येणार असल्याचा गंभीर आरोप देसाई यांनी केला. मात्र या प्रकरणाबद्दल कोणताही दबाव नसल्याचे स्पष्टीकरण शिक्रापरू पोलिस हेमंत शेडगे यांनी दिले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेती आणि फार्म हाऊसवर संशयित विशाल गायकवाड आणि पीडित मुलीचे आई-वडील कामासाठी राहतात. हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. पीडित मुलीचे आई-वडील कामानिमित्ताने बाहेर गेले होते. त्यावेळी विशाल गाडकवाडने फार्म हाऊसच्या मागच्या मजुर खोल्यांच्या मागे घेऊन जाऊन पिडीतेला जिवे मारण्याची धमकी दिली आणि बलात्कार केला.

हे वाचलं का?

कोण आहेत गणेश बिडकर?

गणेश बिडकर हे पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते आहेत. महानगरपालिका निवडणुकीत बहुचर्चित ठरलेल्या कसबा पेठ-सोमवार पेठ या प्रभागातील लढतीमध्ये काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी गणेश बीडकर यांना पराभूत केले होते. महापालिका निवडणुकीत भाजपची लाट असताना पक्षाच्याच बालेकिल्ल्यात धंगेकर यांनी गणेश बीडकर यांना पराभूत करण्याची किमया केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT