रत्नागिरीत राजन साळवींच्या गडाला सुरुंग; CM शिंदे एक नगरपंचायत ताब्यात घेऊनच परतले!
रत्नागिरी : एकहाती सत्ता असलेल्या लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. इथले ठाकरे गटाचे नगराध्यक्ष, ५ नगरसेवकांनी आणि २ अपक्ष नगरसेवकांनी रत्नागिरीतील जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेचे एकहाती […]
ADVERTISEMENT
रत्नागिरी : एकहाती सत्ता असलेल्या लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला आणि स्थानिक आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे. इथले ठाकरे गटाचे नगराध्यक्ष, ५ नगरसेवकांनी आणि २ अपक्ष नगरसेवकांनी रत्नागिरीतील जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला.
ADVERTISEMENT
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे लांजा नगरपंचायतीवरही शिवसेनेचे एकहाती वर्चस्व होतं. जानेवारी २०२० मध्ये इथे नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर बाईत निवडून आले होते. तर १७ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे ९, भाजपचे ३, काॅंग्रेसचे २ आणि ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे नगरपंचायतीवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती.
पण लांजामध्ये आमदार राजन साळवी यांना मानणारे जसे नगरसेवक आहेत, तसेच मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांना मानणारे नगरसेवक आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून लांजामध्ये शिवसेनेत मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
हे वाचलं का?
अखेर शुक्रवारी रत्नागिरी येथे पार पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष मनोहर बाईत, नगरसेविका समृद्धी गुरव, वंदना काडगाळकर, सोनाली गुरव, सचिन डोंगरकर, प्रसाद डोर्ले यांच्यासह अपक्ष नगरसेविका मधुरा बापेरकर, दूर्वा भाईशेटे या सात नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आमदार राजन साळवी यांना मोठा धक्का बसला आहे.
जे गेलेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं : आमदार राजन साळवी आक्रमक
या पक्षप्रवेशाबाबत बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले, शिवसेनेतील १२ खासदार, ४० आमदार जसे गेले तसेच लांजा नागरपंचायतीत धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे ५ नगरसेवक सुद्धा शिंदे गटात गेले. ५ नगरसेवक गेले म्हणून शिवसेनेला काहीही फरक पडत नाही. जे शिंदे गटात गेलेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे मग समजेल शिवसेना आणि शिवसैनिक कुठेही हलला नाही.
ADVERTISEMENT
शिंदे गटात लांजा येथील गेलेल्या नगरसेवकांना आम्ही ज्यावेळी व्हीप बजावू त्यावेळी त्यांना तो मान्य करावा, लागेल अन्यथा अपत्रतेच्या कारवाईला त्यांना सामोरे जावं लागेल, असं सांगत लवकरच कायदेशीर पद्धतीने त्यांच्यावर अपत्रतेची कारवाई करणार असल्याचे संकेतही आमदार राजन साळवी यांनी यावेळी दिले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT