Raut: संजय राऊत कायद्याच्या कचाट्यात? शिवसैनिकाची तक्रार, गुन्हा दाखल
Sanjay Raut Controversial Statement about CM Shinde : खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य विधानावरून संजय राऊत यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये (Nashik) गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने […]
ADVERTISEMENT

Sanjay Raut Controversial Statement about CM Shinde : खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य विधानावरून संजय राऊत यांच्याविरुद्ध नाशिकमध्ये (Nashik) गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिसांनी संजय राऊतांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना वादावर निकाल देताना एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य केला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर ठाकरे गट विरुद्ध शिंदे-भाजप असा संघर्ष उफाळून आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना धक्का देत शिवसेनेवरील शिंदेंचा दावा मान्य केला. या निकालावर भाष्य करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले.’ शाह यांच्या विधानावर बोलताना खासदार राऊतांनी अश्लाघ्य विधान केलं.
Sanjay Raut: ‘CM.. XXX चाटतायेत का?, राऊतांची जीभ घसरली; शाहांनाही सुनावलं