Rave Party : सॅनिटरी पॅड, लेन्स बॉक्समध्ये लपवले होते ड्रग्ज; महत्त्वाची माहिती आली समोर
एनसीबीने कार्डेलिया क्रूझच्या जहाजावर केलेल्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या कारवाईनंतर रेव्ह पार्टीबद्दलची एक एक माहिती समोर येऊ लागली आहे. जहाजावर आढळून आलेले अंमली पदार्थ आरोपींनी लेन्स बॉक्स आणि सॅनिटरी पॅडमधून नेण्यात आल्याचं समोर आलं आहे. कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर होत असलेल्या रेव्ह पार्टीचा एनसीबीने शनिवारी (२ ऑक्टोबर) […]
ADVERTISEMENT
एनसीबीने कार्डेलिया क्रूझच्या जहाजावर केलेल्या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या कारवाईनंतर रेव्ह पार्टीबद्दलची एक एक माहिती समोर येऊ लागली आहे. जहाजावर आढळून आलेले अंमली पदार्थ आरोपींनी लेन्स बॉक्स आणि सॅनिटरी पॅडमधून नेण्यात आल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर होत असलेल्या रेव्ह पार्टीचा एनसीबीने शनिवारी (२ ऑक्टोबर) पर्दाफाश केला. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. धाड टाकल्यानंतर एनसीबीने सामनाची झाडाझडती घेतली. यात आर्यन खानच्या लेन्स बॉक्समध्ये, अटक करण्यात आलेल्या तरुणीच्या सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज सापडल्याची माहिती आता समोर आली आहे.
ड्रग्स केसमध्ये आर्यन खान अटकेत, शाहरुखला आधार देण्यासाठी सलमान गेला ‘मन्नत’वर
हे वाचलं का?
एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या लेन्स बॉक्समध्ये ड्रग्ज सापडले. त्याला अंमली पदार्थ सेवन आणि बाळगल्या प्रकरणी तसेच एनडीपीएस कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
एनसीबी सूत्रांनी कारवाईसदंर्भात अधिकची माहिती दिली. रेव्ह पार्टीच्या ठिकाणी केलेल्या तपासात तरुणीच्या सॅनिटरी पॅड आणि मेडिसीन बॉक्समध्ये ड्रग्ज सापडले, असं सूत्रांनी म्हटलं आहे. दरम्यान, आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप संभाषणामधून तो आणि त्याचे मित्र अवैध ड्रग्जबद्दल असल्याचं उघड झालं आहे.
ADVERTISEMENT
आर्यन खानच्या अटकेनंतर NCB चे ‘सिंघम’ समीर वानखेडे पुन्हा चर्चेत, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी आहे खास नातं
ADVERTISEMENT
एनसीबीने या प्रकरणात आर्यन खानसह आठ जणांना अटक केलेली आहे. आर्यन खानसह दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. इतर पाच आरोपींना वैद्यकीय चाचणीनंतर न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
Cruise Drugs Party: आर्यन खानचा ‘तो’ मित्र अरबाज मर्चंट कोण आहे?, ज्याला सुहानाही करते फॉलो
रेव्ह पार्टी प्रकरणात एनसीबीने आर्यन खानला अटक केली. रेव्ह पार्टीतील उपस्थितीबद्दल त्याची चौकशीही करण्यात आली. चौकशीत त्याने पार्टीतील उपस्थितीबद्दलचा खुलासा केला. त्याचबरोबर चार वर्षांपासून ड्रग्ज घेत असल्याचीही एनसीबीला माहिती दिली. आर्यनच्या म्हणण्यानुसार त्याला गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT