By poll: कसब्यात रवींद्र धंगेकर जिंकणार तर चिंचवडमध्ये जगताप, सर्व्हेचा अंदाज
Kasba and Chinchwad by-elections survey: पुणे: पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या चर्चा संपूर्ण राज्यात होत आहेत. असं असताना आता या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावणारा एक्झिट पोल (Exit Poll) समोर आला आहे. द स्ट्रेलिमा या पुण्यातील संस्थेनं केलेल्या सर्वेनुसार कसब्यामध्ये भाजपला (BJP) धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय […]
ADVERTISEMENT
Kasba and Chinchwad by-elections survey: पुणे: पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या चर्चा संपूर्ण राज्यात होत आहेत. असं असताना आता या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावणारा एक्झिट पोल (Exit Poll) समोर आला आहे. द स्ट्रेलिमा या पुण्यातील संस्थेनं केलेल्या सर्वेनुसार कसब्यामध्ये भाजपला (BJP) धक्का बसणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय होणार असल्याचं या सर्वेचा दावा आहे. तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या जिंकतील असा अंदाज या सर्वेचा आहे.
2 मार्चच्या निकालानंतर खरंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वी द स्ट्रेलिमाचा सर्वे काय आहे? हा सर्वे कसा झाला? यासंदर्भातच आपण सविस्तर जाणून घेऊ.
अगदी गल्ली ते मंत्रालयापर्यंत सध्या कसबा आणि चिंचवड कोण जिंकणार? याचीच चर्चा सुरु आहे. या दरम्यान पुण्यातील द स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या कसब्यात भाजपला धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. या ठिकाणी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असा या सर्वेचा अंदाज आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
तर चिंचवडची जागा मात्र भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे.
Kasba Peth By Poll : हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर; कोणाची किती संपत्ती?
ADVERTISEMENT
आता थोडं टक्केवारीत समजून घेऊया:
कसब्यामध्ये काँग्रेसच्या धंगेकरांना 54 टक्के मतं मिळतील तर भाजपच्या रासने यांना 43 टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. इतरांना तीन टक्के मत मिळतील तर इथं विजयाचं अंतर हे 11 टक्क्यांचं राहणार असल्यांचा अंदाज आहे.
ADVERTISEMENT
चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना 44 टक्के मतं मिळतील तर नाना काटे यांना 32 टक्के आणि राहुल कलाटे यांना 21 टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे. इथं विजयातील अंतर हे 12 टक्क्यांचं असेल असा सर्वेचा अंदाज आहे.
स्ट्रेलिमा या संस्थेचा एक्झिट पोल काय सांगतोय?
-
कसबा पेठ
हेमंत रासने – 59,351
रविंद्र धंगेकर – 74,428
-
चिंचवड
राहुल कलाटे – 60,173
नाना काटे – 93,003
अश्विनी जगताप- 1,25,354
Pune : बापटांना घाम फोडला, आता रासनेंशी दोन हात, कोण आहेत रवींद्र धंगेकर?
हा सर्वे स्ट्रेलिमा संस्थेनं मतदानादरम्यान संबंधित भागात जाऊन केला असल्याचा दावा केला आहे. यासाठी रॅंडम सॅम्पलिंग साईज या मेथडोलॉजीचा उपयोग करण्यात आला आहे. संस्थेच्या प्रतिनीधींनी रॅंडमली बुथवर जाऊन लोकांना प्रश्न विचारले आहेत. प्रोबॅबिलीटी प्रपोशनिएट सॅंपल ही पद्धत या सर्वेसाठी अवलंबली आहे.
हा सर्वे द स्ट्रेलिमा या संस्थेचा आहे. याबाबत मुंबई Tak ने हा सर्वे केलेला नाही. तसेच द स्ट्रेलिमाच्या सर्वेबाबत कुठलाही दावा करत नाही.
ADVERTISEMENT