संतोष पोळ… वाईमधील डॉक्टरच्या वेशातील राक्षसाची गोष्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातला सातारा हा जिल्हा सगळ्याच बाबतीत संपन्न जिल्हा…. या जिल्ह्याला सगळ्याच गोष्टी अगदी भरभरुन मिळाल्या आहेत. निसर्गाने भरभरुन दान दिलंय, छत्रपतीचा जिल्हा म्हणून अशी ओळख आहे, इतिहासाचा समृद्ध वारसा आहे. याच सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यात काही वर्षांपूर्वी एक बाई एका गावातून अचानक गायब झाली आणि नंतर बरेच दिवस तिचा पत्ताच लागला नाही. जेव्हा सापडला तेव्हा या बाईचा मृतदेहच हाती लागला. पण या मृतदेहामुळे सुरु झाला एका हत्याकांडांचा रहस्यमय प्रवास….

ADVERTISEMENT

वाई मधलं ते फार्म हाऊस..फार्म हाऊसमधली नारळाची झाडं आणि या झा़डाखाली दडलेली अनेक वर्षांची भयानक रहस्यं आणि या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार असलेला सो कॉल्ड डॉक्टर डेथ…. फक्त वाई नाही फक्त सातारा नाही तर सगळा महाराष्ट्र हादरुन गेला…कारण वाईमध्ये घडलेले हे हत्याकांडच तसं होतं.

हे वाचलं का?

वाईमधला अत्यंत निसर्गरम्य धोम धरणाचा परिसर आणि याच परिसरात होतं तीन एकरात पसरलेलं एक फार्महाऊस आणि याच गावात राहायचा एक डॉक्टर…हा डॉक्टर गावात देवमाणूस म्हणूनच ओळखला जायचा. कारणंही तसंच होतं. गाव आडवळणाला असल्याने अडीअडचणीला डॉक्टरची गरज ही असायचीच…त्यात पोळ डॉक्टर हा गावातला प्रतिष्ठीत माणूस…ग्रामपंचायत सदस्य, पोलिसांबरोबर उठबस, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा मेंबर तसेच एक बनावट नोटांचे प्रकरण याने पोलिसांना खबर दिली. त्यामुळे गावात जेवढा दबदबा आवश्यक तेवढा हा राखून होता.

कोणी वाटेला जाण्याचा कारण नाही…उलट डॉक्टर असल्याकारणाने लोकांच्या नजरेत आदराचे स्थान. सगळं कसं, नीट व्यवस्थित चाललं होतं. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी डॉक्टर साहेबांनी महिलांशी लगट करतो म्हणून एका गावात थोडा मार खाल्ला होता. पण नंतर डॉक्टर साहेबांनी तो एरियाच बदलला आणि नंतर मग लोक पण विसरुन गेली की काय घडलं होतं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

झालं असं १५ जून २०१६ वाईच्या बस स्टँडवरून एक महिला गायब झाली. जिचं नाव होतं मंगला जेधे.. मंगला जेधे मुलीकडे चालले म्हणून घरातून बाहेर पडली होती आणि गायब झाली होती. पोलिसांकडे तक्रार गेल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. जेधेंच्या कुटुंबियांकडे चौकशी केल्यानंतर डॉ. संतोष पोळ यांचे नाव समोर आलं. मंगला जेधे या गावातलं मोठं नाव होतं. त्या अंगणवाडी सेविका होत्या. राजकीय वजन असतं. त्यामुळे पोलीसांना जरा जास्त कष्ट लावून तपास करावा लागतो.

पोलिसांनी सुरुवातीला डॉक्टरसाहेबांकडे चौकशी केली पण त्यात फार काही हाती लागलं नाही. पोलिसांनी डॉक्टरांना सो़डलं पण प्रकरणाचा तपास सोडला नाही.जेधे बाईंच्या मोबाईलचा शोध पोलिसांनी सुरु केला. हा फोन सुरु असल्याचे पोलिसांनी ट्रेस केलं आणि फोनच सीमकार्ड सापडलं ते ज्योती मांढरे या व्यक्तीकडे.

आता ज्योती मांढरे? कोण तर ज्योती मांढरे डॉक्टर साहेबांची राईट हँड, त्यांना दवाखान्यात मदत करणारी… झालं.. पोलिसांनी केस सोडवली होती एकदम सरळसोट मॅटर. पण खरं स्टोरी तर इथूनच सुरु झाली…पोलीस कोठडीत ज्योतीचे दिवे लावायला पोलिसांनी सुरुवात केली आणि तेव्हा ज्योतीने जो काही प्रकाश पाडला त्यामुळे सातारा पोलिसांचे डोळे दिपून गेले. कारण ज्योती मांढरेने अत्यंत स्फोटक आणि अंगावर शहारे आणणारी माहीती पोलीस कोठडीत दिली.

२००३ मध्ये सुरेखा नावाची एक महिला वाई धोम परिसरातून गायब झाली होती. तिचा शोध काही लागला नाही पोलीसांनी पण नेहमीप्रमाणे नाद सोडून दिला फाईल क्लोज झाली. २००६ मध्ये वनिता गायकवाड नावाची महिला पुन्हा याच परिसरातून नाहीशी झाली पोलीसांकडे तक्रार आली पोलीसांनी तपास सुरु केला पुढे काही सापडलं नाही पुन्हा फाईल बंद…तपास संपला. २०१० मध्ये जगाबाई नावाची महिला गायब झाली. घरी आली नाही. बाहेर गेली ती सापडली नाही. पोलीस- तपास- फाईल बंद….२०१३ मध्ये एक सोनार वाईच्या परिसरातून गायब झाला….पुन्हा पोलीसांकडे तक्रार, पुन्हा तपास, पुन्हा चौकशी, संशयितांचा यादी पण हाती निराशा. २००३ ते २०१३ या १० वर्षात ३ बायका एक पुरुष एकाच पंचक्रोशीतून गायब झाले पण पोलीसांना याचे धागेदोरे जुळवता आले नाही..कारणं अनेक असतील पण पोलीस अपयशी ठरले हे मान्य करावं लागेल….

२०१६ वर्ष उजाडलं…जानेवारीत सलमा नावाची नर्स गायब झाली तेव्हाही पोलीस काहीच करु शोधू शकले नाहीत आणि त्याच वर्षी २०१६ जून मध्ये जेधे बाई गायब झाल्या आणि प्रकरणाला वाचा फुटली.

ज्योती मांढरे या सगळ्या मर्डरचा काय संबंध तर वरचे ज्या ६ जणांचे खून झाले होते…ते सगळे खून केले होते डॉक्टर संतोष पोळ याने आणि हीच धक्कादायक माहिती ज्योती मांढरेने पोलीसांना मंगला जेधे प्रकरणात दिली.

ज्योती मांढरेच्या अटकेने मंगला जेधे यांच्या खुनाचा शोध लागला असे पोलिसांना वाटतं होते तसं न होता गेल्या १३ वर्षात घडलेल्या अजून पाच खुनांचा उलगडा पोलीसांसमोर झाला

मात्र आता इथून पुढचा तपास हा अजून जास्त घाबरवणारा आणि भीतीदायक होता. कारण ज्योती मांढरेने जी माहिती दिली त्यानुसार पोलीस डॉक्टर पोळच्या फार्महाऊसवर पोचले, तिथं गेल्यावर पोलिसांना दिसले ते जेसीबीच्या मदतीने खणलेले खड्डे् आणि एका ओळीत लावलेली नारळाची झाडं…काय होता यांचा संबंध ?

तर संतोष पोळ हा परिसरातला एक प्रतिष्ठित डॉक्टर होता.पण खरी मेख इथंच होती तो खरा डॉक्टरच नव्हता..त्याची डिग्री बोगस होती.

संतोष पोळ आणि त्याचं सावज हे वर्ष वर्ष आधी हेरायचा. त्यांच्याशी जवळीक वाढवायचा. माणूस म्हटलं की आजारपण हे आलंच. उपचाराच्या निमित्ताने तो फार्महाऊसवर बोलवायचा त्यांना उपचाराच्या बहाण्याने भुलीचं इंजेक्शन द्यायला. भुलीचे इंजेक्शन दिलं की त्या माणसाचा मेंदू काम करायचा त्याला कळायचं की त्याच्यासोबत काय घडतंय ते पण शरीर लुळं पडलेलं असल्यामुळे काहीच होऊ शकायचं नाही….खड्डा हा आधीच खणलेला असायचा…जीवंतपणी गाडलं जायचं आणि वरं उगावायचं ते नारळाचं झाड…

ऐकायलं घाण वाटेल पण माणसाचंच खतं मिळाल्याने नारळाची झाडं पण टरारुन वाढयाची….असेच ६ जणांना संतोष पोळने त्याच्या फार्म हाऊसला गाडलं…आणि वर दिली नारळाची झाडं लावून…..

ज्योती मांढरेला जेव्हा पोलीस घेऊन फार्म हाऊसला गेले तेव्हा हे 6 खड्डे खणले आणि नारळाच्या झाडाखाली मिळाले 6 सांगाडे…. पण पोलिसांना तिथं सातवा खड्डा खणून ठेवलेला दिसला आणि चौकशीत याचा उलगडा झाला की हा सातवा खड्डा होता खुद्द ज्योती मांढरे साठी…तिचाच खून संतोष पोळला करायचा होता पण त्याआधी वेगळेच फासे पडले आणि संतोष पोळचे कारनामे बाहेर आले..

ज्योती मांढरेला जेव्हा सातारा पोलीसांनी ताब्यात घेतलं तेव्हा संतोष पोळने लगेचच वाईतून पोबारा केला पण मागावर असलेल्या पोलिसांनी लगेचच सुत्र हलवत मुंबईतून त्याला ताब्यात घेतलं.

संतोष पोळने हे खून का केले?

संतोष पोळने पोलीसांकडे जो कबुलीजबाब दिला त्यातून अशी माहिती मिळाली की ज्या महिलांचा संतोष पोळने खून केला त्यांच्या मागावर तो काही महिन्यांपासून असायचा. त्यांना गुप्तरोग किंवा एड्स झाल्याची भिती दाखवली जायची. त्यातून त्यांचे आर्थिक शोषण केलं जायचं आणि नंतर जेव्हा रसद मिळणं बंद व्हायचं तेव्हा त्यांना ठार मारलं जायचं. खड्डेसुध्दा 2 महिने आधीच खणुन ठेवलेले असायचे.

काही जण म्हणतात की संतोष पोळ हा सायको होता, विकृत होता पण एक मात्र खरं हे सगळे खून संतोष पोळने अत्यंत थंड डोक्याने केलं,

आता या घटनेला 6 वर्ष उलटून गेली पण अजूनही वाई महाबळेश्वरच्या परिसरात संतोष पोळंच नाव निघालं की लोकांची भीतीने थरकाप उडतो….

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT