BMC मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 20 ते 40 हजार रूपये मिळणार पगार!
BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC)एकूण 15 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावक विभागात सादर करायचे आहेत.
ADVERTISEMENT
BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) इ सी जी तंत्रज्ञ या पदासाठी 2 जागा, तंत्रज्ञ या पदासाठी 2 जागा, औषध निर्माता या पदासाठी 5 जागा, कनिष्ठ व्यवसायोपचार तज्ञ या पदासाठी 2 जागा, समाज विकास अधिकारी या पदासाठी 4 जागा आहेत. अशा एकूण 15 जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक-जावक विभागात सादर करायचे आहेत.(recruitment of government job in Brihanmumbai Municipal Corporation 20 to 40 thousand rupees salary)
ADVERTISEMENT
हेही वाचा : Eknath Shinde : शिंदेंची रणनीती भाजपलाच देणार धक्का? ठाण्यात 'या' मतदारसंघासाठी जोरबैठका सुरू
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारे उमेदवार,
-
इ सी जी तंत्रज्ञ- उमेदवार बारावीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मार्फत चालविला जाणारा कार्ड टेक्नॉलॉजी विषयातील बी पी एम टी हा पूर्ण वेळ साडेतीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला असावा किंवा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचे विज्ञान शाखेची पद्धत विज्ञान पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा इ सी जी मधील कामाचा सहा महिन्याचा अनुभव असावा.
हे वाचलं का?
हेही वाचा : Vidhan Parishad Election : मविआ विरुद्ध महायुती... कुणाचा उमेदवार पडणार?
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. 20 ते 40 हजार रूपये पगार मिळणार.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 838 एवढे शुल्क आकारले जात असून हे शुल्क लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या रोखपाल विभागात कार्यालयीन वेळेत भरायचे आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : रवींद्र वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण
अधिक माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous वरून माहिती मिळवू शकता.
ADVERTISEMENT
अधिकृत जाहिरात
https://www.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/Adv%20for%20recruitment%20of%20different%20post%20on%20contract%20%20in%20LTMG.pdf
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT