Pratap Sarnaik: रिक्षा चालक ते 125 कोटींचा मालक… कोण आहेत आमदार प्रताप सरनाईक?

मुंबई तक

ठाणे: ठाण्याचे (Thane) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयावर 24 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने छापे टाकले होते. तेव्हापासून जवळजवळ अज्ञातवासात गेले होते. पण काल (21 जून) त्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. ठाण्यातील बडं प्रस्थ असणाऱ्या प्रताप सरनाईक हे खरं तर अगदी सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ठाणे: ठाण्याचे (Thane) शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांच्या घरावर आणि कार्यालयावर 24 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने छापे टाकले होते. तेव्हापासून जवळजवळ अज्ञातवासात गेले होते. पण काल (21 जून) त्यांच्या लेटरबॉम्बमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

ठाण्यातील बडं प्रस्थ असणाऱ्या प्रताप सरनाईक हे खरं तर अगदी सामान्य परिस्थितीतून संघर्ष करत आमदारपदापर्यंत पोहचले आहेत. त्यांचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. रिक्षा चालक ते 125 कोटींचा मालक हा नेमका प्रवास कसा होता हे आता आपण जाणून घेऊयात एका खास रिपोर्टमधून.

प्रताप सरनाईक हे मूळचे वर्धातील. मात्र, लहानपणीच ते डोंबिवलीत स्थायिक झाले. इथेच त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण देखील पूर्ण शिक्षण झालं. प्रताप सरनाईक यांचं मूळ आडनाव गांडुळे हे होतं. पण नंतर त्यांनी ते बदलून सरनाईक असं करुन घेतलं.

सुरुवातीच्या काळात आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी डोंबिवलीत अंडा भुर्जीची गाडी देखील लावली होती. तर काही काळ ते रिक्षा देखील चालवत होते असं सांगितलं जातं. अंडा भुर्जी विकणारा, रिक्षा चालविणारा मुलगा हा दरम्यानच्या काळात व्यावसायिक म्हणून नाव कमवू लागला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp