वाशिम : ज्वेलर्सचं दुकान फोडून १०-१५ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला, घटना CCTV मध्ये कैद
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात आज पहाटे दोन चोरट्यांनी ज्वेलर्सचं दुकान फोडून १० ते १५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारंजा शहरातील जितेंद्र ज्वेलर्समध्ये आज पहाटे तीन वाजता हा दरोडा पडला आहे. आज पहाटे तीन वाजता दोन चोरट्यांनी कारमध्ये येऊन शटरचे कुलूप व त्यामागील चॅनल गेटचे कुलूप मोठ्या कात्रीने […]
ADVERTISEMENT
वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात आज पहाटे दोन चोरट्यांनी ज्वेलर्सचं दुकान फोडून १० ते १५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारंजा शहरातील जितेंद्र ज्वेलर्समध्ये आज पहाटे तीन वाजता हा दरोडा पडला आहे.
ADVERTISEMENT
आज पहाटे तीन वाजता दोन चोरट्यांनी कारमध्ये येऊन शटरचे कुलूप व त्यामागील चॅनल गेटचे कुलूप मोठ्या कात्रीने कापून दुकानात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी दुकानाच्या आतील काउंटररच्या ड्रॉपमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले, चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
सोलापूर : रात्रपाळीवरुन आलेल्या बापाला पाण्याच्या पिंपात सापडला २५ दिवसांच्या बालकाचा मृतदेह
हे वाचलं का?
दागिने चोरल्यानंतर दोन्ही चोरट्यांनी कारमधून पलायन केलं आहे. ज्वेलर्सचे मालक कैलास हिरुळकर यांनी या घटनेबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
नागपूर : घरगुती वादातून ४ महिन्यांच्या बाळासह पत्नीला चालत्या बाईकवरुन ढकललं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT