चाकू-पिस्तुलचा धाक दाखवून ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न, चेंबूरमधली धक्कादायक घटना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईतल्या चेंबूर परिसरातील एका ज्वेलर्सचं दुकान अज्ञात चोरट्यांनी चाकू आणि पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. चेंबूरच्या आर.सी. रोडवरील सिंधी कँप भागात ही घटना घडली आहे. या परिसरात असलेलं अलंकार ज्वेलर्सचं दुकान चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजता ३ अज्ञात व्यक्ती दुकानात आल्या…यापैकी एका व्यक्तीच्या हातात पिस्तुल तर एका व्यक्तीच्या हातात चाकू होता. तिसऱ्या व्यक्तीने दुकानाचे मालक कमलेश जैन यांना धमकावून सोनं आणि पैसे मागायला सुरुवात केली.

दुकान मालकाने पैसे आणि सोनं देण्यास नकार देऊन आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यामुळे या आरोपींनी हातात ज्या गोष्टी मिळतील त्या घेऊन पोबारा केला. यावेळी एका आरोपीने मालक कमलेश जैन यांच्या हातावर वार करुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

विरार : पाकीट चोरल्यानंतर पाठलाग करणाऱ्या तरुणाची चोरट्याने केली हत्या

या भागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरु आहे. या भागात सोन्याची दोन-तीन दुकानं आहेत. सध्या सणासुदीच्या काळात गिऱ्हाईक असताना अशा घटना होत असल्यामुळे पोलिसांनी या भागात बंदोबस्त वाढवावा अशी मागणी केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT